मुंबई-विजयदुर्ग प्रवास केवळ पाच तासांत करता यावा, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळने मुंबई-विजयदुर्ग राेराे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास करून ही सेवा गेल्या वर्षी गणेशाेत्सवादरम्यान सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.मात्र, तांत्रिक अडचणी आणि काही परवानग्या न मिळाल्याने हा मुहूर्त चुकला. आता ही सेवा सुरू करण्यासाठी सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत.प्रायाेगिक तत्त्वावर महिनाभर या सेवेचे संचालन करण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियु्नती करण्यासाठी सागरी मंडळाने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या.ही निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्याचे सागरी मंडळाचे नियाेजन आहे.मुंबई-सिंधुदुर्ग असा रस्ते प्रवास आजघडीला अडचणीचा बनला आहे.
मुंबई-गाेवा द्रुतगती महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे रस्ते प्रवास करताना प्रवासी आणि वाहनचालकांना माेठी कसरत करावी लागते. प्रवासासाठी अधिक वेळ खर्च हाेताे. दुसरीकडे रेल्ववा एसटीने प्रवास करण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. महत्त्वाचे म्हणजे गणेशाेत्सवात काेकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल हाेतात.या सर्व पार्श्वभूमीवर सागरी मंडळाने मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अतिजलद करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार मुंबई- विजयदुर्ग राे-राे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर राे-राे जेट्टीत करण्यात आले. आवश्यक पायाभूत सुविधाही विकसित करण्यात आल्या. एप्रिलपासून महिनाभर प्रायाेगिक तत्त्वावर सेवा सुरू हाेईल. ही सेवा यशस्वी ठरल्यानंतर सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप यांनी दिली.