डायरिया हा एक असा आजार आहे जाे जगभरात पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे सर्वांत माेठे कारण आहे.यामुळे मरणाऱ्या मुलांची संख्या एड्स, मलेरिया व मीजल्सने मरणाऱ्या एकूण रुग्णांपेक्षाही जास्त आहे. भारतात डायरियामुहे सर्वांत जास्त प्राण जातात. या कारणामुळे सुमारे 5 लाख मुलांचा दरवर्षी मृत्यू हाेताे. अशा स्थितीत डायरिया, यापासून सुरक्षिततेचे उपाय आणि उपचार याविषयी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे.
डायरियामुळे हाेणारे निर्जलीकरण व खनिज पदार्थांचा अभाव मृत्यूचे मुख्य कारण असते. मृत्यूसाठी जबाबदार दुसरे सर्वांत माेठे कारण कुपाेषण आहे.डायरियाने पीडित मुलाला पुन्हा सुदृढ हाेण्यासाठी पाेषक आहाराची गरज असते. डायरियापासून वाचण्यासाठी याेग्य साफ-सफाई ठेवणे आवश्यक आहे. डायरियापासून सुरक्षा व उपचाराचे तीन सामान्य नियम आहेत जे खूप प्रभावी ठरतात.
हात धुण्यासाठी साबणाचा वापर.स्वयंपाक करताना, खाताना व खाऊ घालण्यापूर्वी तसेच शाैचानंतर साबणाने उत्तम प्रकारे हात धुवायला हवेत.
पिण्याच्या पाण्याची साफ-सफाई : पाणी उकळून, फिल्टर करून वा ्नलाेरीनने ट्रीट करूनच प्यावे.पाण्याची भांडी व जागा स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे.
जुलाब हाेत असल्यास रुग्णाला त्वरित जीवनरक्षक द्राव देण्यास सुरुवात करावी. स्तनपान चालू ठेवावे व पाैष्टिक आहार द्यावा.