अग्रगण्य बनण्याच्या दिशेने शासनाची वाटचाल : गाेयल

    21-Feb-2026
Total Views |
 
 

goyal 
सर्वसमावेशक विकास, जागतिक गुंतवणूक, नवतंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागातून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने शासनाची गतिमान वाटचाल सुरू आहे. येत्या काळात देशाला सर्व क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन कृतिशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्याेग मंत्री पीयूष गाेयल यांनी केले.परराष्ट्र मंत्रालय, फ्युचर इकाॅनाॅमिक काॅर्पाेरेशन काैन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने आयाेजित ग्लाेबल इकाॅनाॅमिक काे ऑपरेशन समीटमधील संवाद सत्रात गाेयल बाेलत हाेतेएफईसीआयसीचे कार्यकारी संचालक विजय चाैथाईवाला यांनी या संवाद सत्राचे संचालन केले.
 
देशभरात महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या विकासाला गती देण्यात आली आहे. उद्याेग आणि गुंतवणूक वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून, उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध प्राेत्साहन याेजना राबवण्यात येत आहेत. ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’सारख्या कार्यक्रमांतून युवकांना काैशल्यविकास आणि उद्याेजकतेसाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे गाेयल यांनी सांगितले.