भारतात आयफाेन आणि अॅपल कंपनीची इतर प्राॅडक्ट विकत घेण्याचं प्रमाण खूप आहे. या उत्पादनांची गुणवत्ता हेच त्यामागचं कारण नाही, तर त्यांच्याशी जाेडलेली प्रतिष्ठाही कारणीभूत आहे. आयफाेन वापरायला अवघड असतात, अँड्राॅइडच्या अनेक साेयीसुविधा त्यात नसतात, अत्युत्तम दर्जाचा कॅमेरा आणि सुरक्षा ही दाेन महत्त्वाची कारणं असतात आयफाेनच्या खरेदीसाठी. यातला कॅमेरा तर आता सॅमसंग, व्हिवाे यांसारख्या कंपन्यांनीही उत्तम दर्जाचा देतात. सुरक्षिततेची फीचर्सही वाढत आहेत. शिवाय वापरायला साेपे असलेले हे फाेन स्वस्तही मिळतात. तरी भारतात आयफाेनची क्रेझ वाढतेच आहे. आता या क्रेझमध्ये अधिकाधिक लाेकांना सहभागी हाेता यावे, यासाठी अॅपलने काही आयफाेनच्या सिरीज, मॅकबुक वगैरे उत्पादनं माेठ्या डिस्काऊंटसह देण्याचा नवा फंडा वापरला आहे. ही मार्केटिंगची युक्ती चांगलीच आहे. मात्र, दीड लाखाचं मॅकबुक निम्म्या किंमतीत मिळतंय या आनंदात अनेक लाेक त्यांची अॅपल प्लस आफ्टर सेल्स सर्व्हिस, जी भरपूर महाग आहे, ती घेत नाहीत. त्यानंतर तुमच्या डिव्हाइसमध्ये काही प्राॅब्लेम आला आणि अॅपलकडे ताे दुरुस्त करून घ्यायला गेलात, तर जाे खर्च येताे, ताे डिस्काऊंट मिळाला हाेता, तेवढाच असू शकताे. त्यापेक्षा अॅपल प्लस घ्या.हत्तीच पाळायला घेतला आहे, तर गवतात काटकसर करून काय उपयाेग?