केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कडचिरा शहरात अलिकडेच झालेल्या मंदिर महाेत्सवात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला शास्त्रीय नृत्य सादर करताना पाहून मंदिर अधिकारी आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. याबाबतची माहिती अशी हाेती की, 28 वर्षे सैन्यात सेवा बजावलेल्या सुभेदार मेजर लिजेश यांची मुलगी वैदेही मंदिर महाेत्सवात नृत्य सादर करणार हाेती. तथापि, जेव्हा मेजर लिजेश देखील वैदेहीसाेबत पारंपरिक भरतनाट्यम पाेषाख परिधान करून आले तेव्हा सर्वांना धक्का बसला.लिजेश म्हणतात की, जेव्हा आम्ही आमची नावे नाेंदवली तेव्हा आम्ही ‘वैदेही आणि लिजेश’ लिहिले, जे आयाेजकांना चूक वाटले. दाेन्ही नावांमध्ये ‘आणि’ लिहिले हाेते. लिजेश आणि त्यांच्या मुलीला पारंपरिक नृत्य करताना पाहून बरेच लाेक अवाक झाले, कारण बहुतेक लाेकांनी मेजर लिजेशला लष्कराच्या गणवेशात किंवा भारतीय सैन्याला शाेभणाऱ्या नीटनेटक्या कपड्यांमध्ये आपले काैशल्य दाखवताना पाहिले हाेते.
मग हा चमत्कार कसा घडला? 50 वर्षीय मेजर लिजेश 2024 मध्ये निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीला भरतनाट्यमसह कराटेही शिकवले हाेते. मुलींनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्शल आर्ट्स शिकले पाहिजेत असे त्याचे मत हाेते. याबाबत वडिलांना त्यांच्या मुलीकडून पूर्णपणे वेगळा प्रतिसाद मिळाला. मुलगी म्हणाली की, बाबा, मला कराटे अजिबात आवडत नाही, ही मुलांसाठी एक कला आहे, मला भरतनाट्यम करायचे आहे. मात्र, वडील लिजेश यांनी त्यांच्या मुलीला सांगितले की काेणतीही कलामहिलांसाठी किंवा पुरुषांसाठी नाही, जर तू कराटे शिकलीस तर मी भरतनाट्यम शिकेन. यानंतर मुलीने विचारले हाेते की त्यानंतर तुम्ही मंदिराच्या उत्सवात माझ्याबराेबर परफाॅर्म कराल का? त्यावर वडिलांनी ‘हाे’ असे उत्तर दिले हाेते आणि त्यांनी वैदेहीला दिलेल्या वचनाप्रमाणे नृत्यकाैशल्य शिकून मंदिर महाेत्सवात तिच्याबराेबर परफाॅर्मही केले.