मुलांच्या भावनिक विकासासाठी दृढ संवाद साधा

    02-Feb-2026
Total Views |
 

child 
 
मुलांशी निकाेप संवाद साधण्यासाठी, त्यांना सक्रियपणे ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्याशी डाेळ्यांच्या पातळीवर संवाद साधा.त्यांच्याशी राेजच्या गाेष्टींबद्दल बाेला, प्रश्न विचारा आणि त्यांचे बाेलणे लक्षपूर्वक ऐका. पुस्तके वाचणे, गाणी म्हणणे आणि शब्दांचे खेळ खेळणे यांसारख्या गाेष्टींमधून त्यांचा शब्दसंग्रह आणि संवाद काैशल्ये वाढवता येतात.काळाबराेबर आपणही बदललाे आहाेत. आज मुलांशी माेकळेपणाने बाेलताेय, त्यांच्याबराेबर बसून चिकनी चमेली सारखी गाणी बघताेय जे कधी आपल्या आईवडीलांबराेबर करू शकत नव्हताे.मुलाने मुलीकडे, मुलीने मुलांकडे बघणे, आकर्षण वाटणं, हे अगदी नाॅर्मल आहे. तीव्र शब्दात त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याच्या/तिच्या ह्या भावना समजून घेऊन संवाद साधायला हवा. आपण तू कसा चूक आहे व मुलं ताे स्वतः कसा बराेबर आहे, असे एकमेकाबद्दलचे विरुद्ध समज सिद्ध करत असताे/ चढाओढ सुरू असते. आज आईवडील दाेघही काम करतात त्यामुळे त्यांच्याजवळ वेळ साेडून सगळं काही आहे. मुलं जेव्हा बाेलू इच्छितं तेव्हा वेळ नसताे किंवा थकलेलाे असताे आणि कधीतरी हे सगळं बाजूला ठेवून काहीतरी काम करता करता ऐकण्याचं नाटक करत कृत्रिम हुंकार देत असताे.
 
मुलांशी निकाेप संवाद कसा साधाल? मुले जसजशी माेठी हाेतात तसतसे ते पालकांशी माेकळेपणा कमी करतात. परंतु मुलांशी मजबूत संवाद खूप महत्वाचा आहे. मुलाचा आत्मविश्वास आणि भावनिक विकासासाठी हे खूप महत्वाचे आहे. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या मुलाशी निराेगी आणि मजबूत संवाद साधायचा असेल तर पुढील गाेष्टी लक्षात ठेवा.लक्षपूर्वक ऐकण्याचा सराव करा. ऐकणे हा संवादाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मूल जेव्हा काही बाेलते असेल तेव्हा त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. फाेन किंवा टीव्हीपासून दूर रहा, त्याच्या नजरेत पहा, त्याला टाेकू नका. त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलाला वाटेल की माझा हा दृष्टिकाेन तुमच्यासाठी महत्वाचा आहे.भावना समजून घ्या. म्हणजेच मुलाच्या बाेलण्यातील शब्द इकडेतिकडे हाेऊ शकतात मात्र पालक म्हणून त्याच्या भावना काय आहेत आणि शब्दांपेक्षा त्याला काय म्हणायचे आहे याकडे लक्ष द्या.मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.आनंद असाे, राग असाे किंवा भीती असाे, त्यांच्या भावना मान्य करा.