साैंदर्य खुलवणारे छाेटे छाेटे उपाय

    18-Feb-2026
Total Views |
 

skin 
 
वचेबाबत दक्षता आवश्यक असते. जेणेकरून ती कांतिमय राखता येऊ शकेल. या लेखाद्वारे काही साेपे घरगुती उपाय देत आहाेत जे या माेसमात उपयु्नत ठरू शकतात.
 
सफरचंद : हे त्वचेतील नैसर्गिक तेल नियंत्रित ठेवते.ऑयली त्वचेसाठी हा उपाय फायदेशीर आहे. वापर : सफरचंदाच्या तुकड्यांचा लगदा बनवून त्याचा पातळ थर चेहऱ्यावर लावावा. पंधरा मिनिटांनंतर काेमट पाण्याने चेहरा धुवावा.
 
टाेमॅटाे : हा त्वचा मुलायम राखताे. याच्या वापरामुळे त्वचेचे डागही हळूहळू कमी हाेतात.
 
वापर : टाेमॅटाेचा रस, लिंबाचा रस, ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन व्यवस्थित मिसळावे. हात-ताेंड धुतल्यानंतर या मिश्रणाने त्वचेची मालीश करावी. अर्ध्या तासानंतर काेमट पाण्याने धुवावी.
 
केळी : हे त्वचेत तुकतुकीतपणा आणते व सुरकुत्या घालवते.
 
वापर : पिकलेले केळ कुस्करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा. त्चचेत चमक व तुकतुकीतपणा येईल.
 
जरबेरी : हे काेमजलेल्या त्वचेला दिव्यत्व देते.
 
वापर : थाेड्याशा लाेण्यात ताजी जरबेरी वाटून मिसळा. चेहऱ्यावर पातळ लेप लावून अर्ध्या तासानंतर काेमट पाण्याने धुवा. त्वचा एकदम मुलायम हाेईल.
 
मध : त्वचेच्या सुरकुत्या घालवण्यासाठी खूपच उपयु्नत. हा रूक्ष त्वचा मुलायम व चमकदार बनवताे.
 
वापर : चेहऱ्यावर मधाचा पातळ थर 20 मिनिटे लावून ठेवा व नंतर रुई पाण्यात भिजवून चेहरा पुसून घ्या. ऑयली त्वचेसाठी मधात 4-5 थेंब लिंबाचा रस मिसळू शकता.
 
कडुलिंब : हा त्वचेला राेगांपासून वाचवताे. याच्या वापरामुळे मुरमे घालवण्यास मदत हाेते.