शहरांमधील पालक मुलांवर डिटे्निटवद्वारे पाळत ठेवू लागले

    18-Feb-2026
Total Views |
 


child
 
 
शहरांमध्ये आता युवकांवर पाळत ठेवण्याचे काम पालकांना डिटे्निटवकडे देण्याची वेळ आली आहे. मुलांचे मित्र, ते कुठे जातात-येतात, त्यांचे राेजचे वागणे हे सगळे जाणून घेण्यासाठी पालक जासूस कंपन्यांची मदत घेत आहेत.मुलांच्या प्रत्येक छाेट्या-माेठ्या वागण्याची माहिती पालकांना हवी आहे.ड्रग्ज, नवीन मित्र-मैत्रिणी, रिलेशनशिप किंवा संशयास्पद व्यवहार प्रत्येक छाेट्या- माेठ्या संशयाची पडताळणी पालक करू लागले आहेत.जासूस एजेंन्सिचे अधिकारी विकास साेनकर यांनी सांगितले की, गेल्या तीनचार वर्षात यामध्ये खूप वाढ झाली आहे.प्रत्येक महिन्याला किमान 3-4 केसेस तरी येतात. आणि चाैकशीची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. पालकांची सगळ्यात माेठी भीती हीच असते की, त्यांच्या मुलांना व्यसन लागू नये.चुकीच्या नात्यात, प्रेमात, मैत्रीत अडकू नयेत. घरी कार असलेल्या अनेक पालकांना वाटते की, मुलगा कार घेऊन एकटाच कुठेतरी दूर जात आहे.
 
पण, घरी सांगत नाही. अशा वेळी ते व्यावसायिक जासूसची मदत घेत आहेत. युवकांवर पाळत ठेवण्याकडे आता एक गंभीर गरज म्हणून पाहिले जात आहे.व्यसनातून बाहेर पडलेल्या मुलाची पाळत व्यापारी असलेल्या एका पालकाच्या मुलाला व्यसन लागले. खूप प्रयत्न करून त्यांनी त्याला व्यसनातून बाहेर काढले. त्यानंतर ताे कुठे जाताे, कुणाला भेटताे आदी माहिती मिळविण्यासाठी पालकांनी जासूसला हे काम दिले. कारण, मुलगा परत काॅलेजला गेल्यावर, त्याला पुन्हा व्यसन लागण्याची भीती पालकांना वाटत हाेती. तीन आठवडे जासूसने त्याच्यावर पाळत ठेवली व रिपाेर्ट दिला की, मुलगा आता सामान्य जीवन जगत आहे.मुलाशी मैत्री वाढलेल्या मुलींवर पालकांचे लक्ष एका पालकांनी आपल्या मुलीवर पाळत ठेवण्याचे काम डिटे्निटव्हला दिले. कारण, 18 वर्षीय या मुलीची मैत्री तिच्या ्नलासमधील एका मुलाशी वाढली हाेती. तीन आठवडे मुलीवर पाळत ठेवून जासूसने रिपाेर्ट दिलात्यानंतर त्या मुलीशी बाेलून, तिचे काउंसलिंग करून पालकांनी तिला समजावले.
 
पार्टी आणि ई-सिगारेटमुळे वाढली चिंता एका व्यापाऱ्याची 16 वर्षीय मुलगी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू लागली हाेती. ती मित्र-मैत्रिणींबराेबर प्रायव्हेट पार्टीमध्ये जायची. तिथे ई-सिगारेट पिणे ही सामान्य गाेष्ट हाेती. जासूसने याबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी मनाेचिकित्सकाच्या मदतीने तिला यातून बाहेर काढले. याविषयी डाॅ्नटरांनी सांगितले की, युवावस्थेत मुलेइतरांची नक्कल करताना अनेक चुकीच्या सवयी लावून घेतात. पण, या वाईट सवयींचा परिणाम त्यांना माहीत नसताे.पालकांनी युवकांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. राघव अराेडा यांनी सांगितले की, मुलांवर जास्त बंदी घातली तर, ते विद्राेह करू शकतात. आई-वडिलांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवणे गरजेचे आहे.त्यामुळे मुले स्वतः समजूतदार बनतात. घरात बाेलणे बंद झाल्यावर मुले बाहेर आपुलकी, प्रेम शाेधतात.त्यामुळे ते चुकीच्या संगतीत किंवा व्यसनांकडे ओढले जातात.