हे भूमिगत सराेवर कॅलिफाेर्नियाजवळील मेल्लिअसनी लेकमध्ये आहे. त्याचा शाेध 1953मध्ये लागला हाेता. एका भूकंपात या गुंफेचे छत काेसळले हाेते. मेल्लिअसनी हे भूमिगत सराेवर एस्पेरान्ताे आयलँडमध्ये आहे. ते चारी बाजूंनी विशाल गुंफासारख्या दगडांनी घेरलेले आहे. वर्ष 1953मध्ये भूकंपाच्या कारणामुळे गुंफाचे छत काेसळल्याने लाेकांना सराेवराविषयी कळले. 1963मध्ये येथे झालेल्या उत्खननाच्या दरम्यान वैज्ञानिकांना संस्कृतीचे काही महत्त्वाचे अवशेष मिळाले. यात तेलाचे दिवे, प्लेट आणि काही मूर्ती सापडल्या. या सराेवराचे पाणी खारेगाेड आहे. ते गडद निळे दिसते. प्रत्येक वर्षी लाखाेंच्या संख्येने एस्पेरान्ताे आयलँडवर येणारे पर्यटक हे सराेवर पाहायला जरुर जातात.