राज्यात अपंगांच्या कल्याणार्थ कार्यरत असलेल्या 900 संस्थांवर दिव्यांग कल्याण विभागाने अनियमिततेप्रकरणी कठाेर कारवाई केली असून, त्यांची नाेंदणी रद्द केली आहे. चालू वर्षात 363 संस्थांची नाेंदणी रद्द करण्यात आली. काेकण 52, नाशिक 49, पुणे 60, नागपूर 49, अमरावती 50 आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 103 संस्थांचा त्यात समावेश आहे.अपंगांच्या क्षेत्रात राज्यात दाेन हजार संस्था कार्यरत आहेत. आराेग्य, काैशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन,संशाेधन व विकास, शिक्षण-प्रशिक्षण या क्षेत्रात या संस्था काम करतात. यापैकी काही संस्था शासकीय अनुदानित, तर काही संस्था सामाजिक उत्तरदायित्व निधीवर (सीएसआर) चालतात.अपंगांच्या क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांना दिव्यांग कल्याण आयु्नतालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नाेंदणी करणे बंधनकारक आहे.
ऑक्टाेबर 2025 च्या शासन निर्णयानुसार या संस्थांसाठी कार्यप्रणाली निश्चित केलेली आहे. या संस्थांमध्ये अशासकीय (एनजीओ) संस्थांची माेठी संख्या आहे. 2012 पासून अशा संस्थांवर कारवाई करण्यात येत आहे. अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या संस्थांची संख्या 537 हाेती. या वर्षी त्यात 363 संस्थांची भर पडली. दिव्यांगांचे सक्षमीकरण व पुनर्वसन याेग्य पद्धतीने व्हावे, निधीचा विनियाेग अपंगांच्या कल्याणार्थ खचव्हावा, असा या संस्थांवरील कारवाई मागे हेतू असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी आयु्नतालयाकडे नाेंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांगांचे सक्षमीकरण याेग्य पद्धतीने हाेईल. हे कार्य करताना दिव्यांगांच्या ह्नकांचे, अधिकारांचे उल्लंघन हाेणार नाही. सर्व संस्थांनी नाेंदणी करून नियमावलीनुसार कार्य करणे अपेक्षित आहे. जेणेकरून दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण करणे शक्य हाेईल, असे या विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.