कसारा-मनमाड रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

    17-Feb-2026
Total Views |
 
 

Railway 
 
पूर्व, मध्य आणि पश्चिम भारताला जाेडण्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित कसारा-मनमाड दरम्यान तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 131 किमी.च्या या रेल्वे मार्गासाठी 10154 काेटींचा खर्च अपेक्षित आहे.कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गस्थ करताना अतिर्नित इंजिन जाेडावे लागते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबई आणि उत्तर व पूर्व भारताला जाेडणाऱ्या अधिक प्रवासी गाड्या सुरू करणे शक्य हाेणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेल्या प्रकल्पात मनमाड ते कसारा दरम्यान तिसरी व चाैथी रेल्वे मार्गिकाटाकण्याचा समावेश असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. कसारा घाटातील हा आव्हानात्मक प्रकल्प आहे.
 
पाच वर्षांंत ताे पूर्णत्वास नेण्याचे नियाेजन आहे. या प्रकल्पात तीन महत्त्वाचे पूल, 16 माेठे पूल, 218 लहान पूल, पाच रेल्वे उड्डाणपूल, 21 भुयारी मार्ग आणि पाच बाेगद्यांचा समावेश आहे. यातील सर्वांत माेठा बाेगदा 24 किमी.चा असेल.अतिशय व्यस्त मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचा हा भाग आहे. ताे पूर्व, मध्य आणि पश्चिम भारताला जाेडणारा महत्त्वाचा दुवा मानला जाताे. कसारा- मनमाड मार्गाच्या विस्तारीकरणातून या मार्गावर अधिक प्रवासी गाड्या सुरू करणे श्नय हाेणार आहे. या प्रकल्पामुळे राेजगार उपलब्ध हाेणार आहेत. तसेच दरवर्षी 54 काेटी किलाे कार्बन डायऑक्साइडची बचत हाेईल आणि 1207 काेटींच्या लाॅजिस्टिक खर्चात बचत हाेणार आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कसारा ते मनमाड दरम्यान सध्या राेज 100 प्रवासी गाड्या आणि 25 मालगाड्या धावतात. नव्या रेल्वे मार्गामुळे त्यांची संख्या विस्तारता येणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सादरीकरणात नमूद केले हाेते.