बारा ज्याेतिर्लिंगाची चित्रे, बदाम, मनुके, द्राक्षांसह विविध प्रकारची फळे, फुलांनी सजलेली च्न्नयाची शंकराची पिंडी आणि रेखीव असा उमा शंकराचा च्न्नयाचा मुखवटा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात साकारण्यात आला. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात तयार केलेली 101 किलाे च्न्नयाची शंकराची पिंडी व लीना भागवत तसेच लता व प्रमाेद भगवान यांनी जागेवर तयार केलेला हा मुखवटा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली हाेती. प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, कुणाल टिळक यांच्यासह नितीन पंडित यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, काेषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित हाेते. या च्न्नयाचे श्रीखंड करून मंदिरातील भ्नतांना आणि सामाजिक संस्थांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.