माेठ्या आवाजातील संगीत कायमचे बहिरे करू शकते

    17-Feb-2026
Total Views |
 


music
 
बेल्जियममधील गेन्ट युनिव्हर्सिटीतील डी पूर्टेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासामध्ये छुप्या श्रवणदाेषावर लक्ष केंद्रित केले आहे. हा दाेष सूक्ष्म परंतु मेंदूतील पेशींवर (सिनॅप्स) न भरून येणारे बदल घडवून आणताे. ही हानी तातडीने ऐकू येण्याची संवेदना कमी करत नसल्यामुळे, सामान्य चाचण्यांमध्ये अनेकदा ती ओळखताही येत नाही, ज्यामुळे सार्वजनिक आराेग्यासमाेर एक माेठे पण दुर्लक्षित आव्हान उभे राहते.आमच्या अभ्यासाचे उद्दिष्ट ध्वनी-संबंधित श्रवणदाेषाचे सुरुवातीचे प्रकार शाेधणे आणि त्यावर उपचार करण्यासाठी क्लिनिकल केअर सुधारणे हे हाेते, असे डाॅ. डी पूर्टेरे यांनी सांगितले. मानवी कान ध्वनिलहरींचे विद्युतलहरींमध्ये रूपांतर करताे ज्याचा मेंदू अर्थ लावू शकताे. कानाच्या आतील भागात (काेक्लीयामध्ये) संवेदी केसांच्या पेशी आणि श्रवणविषयक मज्जातंतू तंतूंना जाेडणाऱ्या मालिकेवर हाेणाऱ्या आघातामुळे हा दाेष निर्माण हाेताे.
 
छाेटे परंतु धाेकादायक नुकसान : डाॅ. डी पूर्टेरे यांनी श्रवणदाेष स्पष्ट करताना सांगितले की, ‘जसा रेडिओचा आवाज कमी केल्यावर ताे अस्पष्ट हाेताे, तसाच माणसावर परिणामाचा हा अनुभव असताे. हा दाेष एखाद्या खराब झालेल्या केबलसारखा असताे, जिथे आवाज पुरेसा असू शकताे परंतु स्पष्टता हरवलेली असते, विशेषतः जेव्हा पार्श्वभूमीवर काेलाहल असताे.’ प्राण्यांवरील माॅडेल्स आणि मानवी मृतदेहांवरील संशाेधनातून असे दिसून आले आहे की, माेठ्या आवाजाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे ऐकण्याची किमान पातळी परिणाम न हाेता पेशींना इजा हाेऊ शकते, ज्याला काेक्लीअर सिनॅप्टाेपॅथी असे म्हणतात.
 
माेठे संगीत महाेत्सव : संगीत महाेत्सवांमध्ये आवाजाची पातळी अनेकदा शिफारस केलेल्या मर्यादा ओलांडते, ज्यामुळे वैयक्तिक मापन करणे कठीण हाेते. संशाेधकांनी संगीत महाेत्सवांना उपस्थित राहणाऱ्या लाेकांच्या शारीरिक खुणांचे महाेत्सवाच्या आधी आणि नंतर मापन केले. अभ्यासात असे आढळले की, उपस्थित असलेल्या माेठ्या संख्येतील लाेकांना कान सुन्न करणारी लक्षणे जाणवली, त्यांच्या श्रवण शक्तीवर प्रचंड ताण आला हाेता. ज्यांनी अनेक वर्षांपासून श्रवण संरक्षणाचा (उदाहरण : इअर प्लग) वापर केला हाेता, त्यांची श्रवणशक्ती इतरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या चांगली हाेती.
 
भारताच्या संदर्भातील चिंता : मंगळुरू येथील फादर्स म्युलर काॅलेज ऑफ स्पीच अँड हियरिंगच्या प्राध्यापिका प्रशास्ती पी. पूवय्या यांच्या मते, ‘80 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या सतत संपर्कामुळे बहिरेपण येऊ शकते. विकसित देशांमध्ये ध्वनी मर्यादांचे कडक पालन केले जात असतानाही ‘लपलेला’ श्रवणदाेष कायम आहे. भारतात ध्वनी मर्यादा अनेकदा पाळल्या जात नाहीत किंवा त्या लागू करण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे, त्यामुळे जास्त नुकसानीची शक्यता आहे.केसांच्या पेशींचे नुकसान हाेऊ न देणे, हा श्रवणदाेष टाळण्याचा पर्याय असू शकताे. तज्ज्ञांचा असा इशारा आहे की, हे सुरुवातीचे बदल भविष्यात गंभीर बहिरेपण हाेऊ शकतात. त्यामुळे, कमी वयातच प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि कानाच्या आजारांचे याेग्य शिक्षण देणे, हे बहिरेपणाची हानी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.