दिलखुलास आणि जय महाराष्ट्रमध्ये डाॅ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

    17-Feb-2026
Total Views |
 
 
 
interview
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाचे कामकाज, तसेच राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी घेतलेले धाेरणात्मक निर्णय या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचे संवर्धन करणे आणि किल्ल्यांचे मूळ वैभव अबाधित ठेवणे या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध स्तरांवर नियाेजनबद्ध आणि प्रभावी उपाययाेजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील ऐतिहासिक वारसा, गडकिल्ले, स्मारके आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी धाेरणात्मक नियाेजन; तसेच विविध शासकीय आणि तज्ज्ञ संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विभागामार्फत केले जात आहे.
 
राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध याेजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती डाॅ. कुलकर्णी यांनी या मुलाखतीत दिली आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (17) आणि बुधवारी (18 फेब्रुवारी) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित हाेईल. ती न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवरही उपलब्ध राहणार आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (17 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित हाेईल. याशिवाय ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही उपलब्ध आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका डाॅ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.