भाजण्याची कारणे : स्टाेव्ह फुटणे, गॅस सिलेंडर फुटणे, गरम पाणी जाळावरून उतरवताना शरीर भाजते. लहान मुलेही आपल्या बेसावधपणामुळे याची शिकार हाेतात. अशावेळी प्राथमिक उपचाराची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.बहुधा लाक भाजल्यानंतर क्रीम वा लेप इ. लावतात. यामुळे क्षणिक आराम मिळताे. पण ंतर जखम लवकर भरत नाही. कित्येकदा तर या लेपांमुळे इन्फे्नशनसुद्धा हाेते. सांगायचे तात्पर्य हेच की प्राथमिक उपचाराीच माहिती असेल तर स्थिती भयानक हाेण्यापासून वाचवणे आपल्या हाती असते.भाजण्याच्या स्थितीला डाॅ्नटरी भाषेत तीन भागांत विभागले गेले आहे.- फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री व थर्ड डिग्री. पाहूया या स्थितीत शरीर भाजले तर ृप्राथमिक उपचारात काय करायला हवे?
फर्स्ट डिग्री : या श्रेणीत जळजळ कमी हाेते व याचा दुष्परिणामही हाेत नाही. यात त्वचेवर झळ लागल्यामुळे ती जागा लाल हाेते व तिथे जळजळ वा आग हाेते. जी काही वेळेनंतर बरी हाेते. अशा भाजलेया जागी पाणी टाकावे व एखादे अॅन्टीसेप्टिक लाेशन लावावे. ज्यामुळे जखम वाढणार नाही व जळजळही कमी हाेईल.
सेकंड डिग्री : यात फर्स्ट डिग्रीपेक्षाही जास्त जळजळ हाेते. यात भाजलेल्या जागेची त्वचा लाल वा पिवळी हाेते.कित्येकदा वरची त्वचा जळते व भाजल्याचा परिणाम मांसापर्यंत हाेताे. फाेड येतात. नेहमी सेकंड डिग्रीपर्यंत भाजण्यासाठी गरमचहा, गरम पाणी वा गरम दूध जबाबदार असते.यामुळे प्रभावित ठिकाणी तीव्र पीडा हाेते.कित्येकदा ताे अवयव निष्क्रियही हाेताे.या स्थितीत भाजलेल्या त्वचेवर अॅन्टीसेप्टिक लाेशन रूईने हलके हलके लावावे. त्यावर धूळ व मळ साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजलेल्या जागेवरील कपडे हळू हळू हटवावेप्रभावित अवयव साेडा बाय कार्बच्या द्रावणाने (एक पेला उकळून गार केलेले पाण्यात 25 ग्रॅम साेडाबाय कार्ब मिसळा) थाेड्या थाेड्या वेळाने सफाई करावी. जर आराम न पडल्यास डाॅ्नटरांची मदत घ्यावी.भाजल्यानंतर फाेड आल्यास ते हात वा काेणत्याही वस्तूने फाेडू नयेत. रुग्णास पाणी वारंवार पाजावे व पातळ कापडाने भाजलेला भाग झाकावा.
थर्ड डिग्री : ही अत्यंत गंभीर स्थिती असते. यात शरीराची त्वचा व मांस जळते. एवढेच की शिरा हाडांपयंत दिसू लागतात. अशा प्रकारच्या दुर्घटना माेठ्या अग्निकांडज्ञत वा किचनमध्ये बेसावधानतेने कपडे पेटल्यामुळे घडतात. यात शीराचा बराच भाग जळून काळा पडताे.जागाेजागी फाेड येतात. अशावेळी आपण तिथे असाल तर या स्थितीत व्यक्तीच्या कपड्यांना लागलेली आग विझवण्यासाठी ब्लँकेट गुंडाळावे वा व्यक्ती शुद्घीवर असेल तर तिला जमिनीवर णाेपण्यास सांगावे. साेबतच तिला हाॅस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करावी व आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फाेन करावा. तसेच शेजाऱ्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा.भाजलेल्या व्यक्तीचे कपडे ओढून काढू नये. तिच्या शरीरावर पातळ कापडाने झाकावे. जेणेकरून इन्फे्नशन हाेणार नाही वा माशा-मच्छर बसणार नाही. तिला वारंवार पाणी पाजावे.थर्ड डिग्रीपर्यंत भाजलेल्या व्यक्तीची वाचण्याची श्नयता खूप कमी असते तरीही श्नय तेवढे प्रयत्न करून डाॅ्नटरी मदत उपलब्ध करायलाच हवी.