गेल्या दशकभरात कर्कराेग वेगाने वाढत आहे. देशाने आराेग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली तरी सध्या कर्कराेग हा आराेग्य व्यवस्थेसमाेरील सर्वांत माेठ्या आव्हानांपैकी एक आहे.ही समस्या जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवते आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘ऑन्काेलाॅजी बियाॅन्ड बाॅर्डर्स’ या जागतिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते
एनसीआयचे अध्यक्ष अॅड. सुनील मनाेहर, एनसीआयचे महासचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जाेगळेकर, काेषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डाॅ. आनंद पाठक; तसेच एनसीआयचे ग्लाेबल ऑपरेशन्स अँड स्ट्रॅटेजी डायरेक्टर शशी मंदापती यांच्यासह आराेग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते.कर्कराेग उपचाराच्या क्षेत्रात अधिक संशाेधन, बायाेटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा व्यापक वापर आवश्यक आहे.विशेषतः वेळेत निदान आणि प्रारंभिक टप्प्यातच कर्कराेगावर प्रभावीपणे मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा माेठ्या प्रमाणावर उपयाेग हाेण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केली. एनसीआय आणि गयाना या देशातील आराेग्य विभागादरम्यान कर्कराेग उपचारपद्धती या संदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. ‘द विंग्स’ वृत्तपत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.