माणूस हा कुशल अभिनेता माणूस हा कुशल अभिनेता असताे. लहान असताना आपण शिकताे की, चेहऱ्यावर काेणत्या प्रकारचे भाव आणल्यावर आपण पालकांची सहानुभूती किंवा जे पाहिजे ते मिळवू शकताे.जीवनात प्रत्येक टप्प्यावर अशा प्रकारे अभिनय दाखविण्याची संधी असते. त्यामुळे पूर्ण सजग राहून तुमच्या भूमिका पार पाडा आणि हिराे बना, असे मत लेखक राॅबर्ट ग्रीन यांनी द लाॅज ऑफ ह्यूमन नेचर या पुस्तकात व्यक्त केले आहे. जीवनातील नाटकीय रूप स्वीकारा त्यांनी मत व्यक्त केले की, आपल्याला जीवनातील नाटकीय रूप समजले पाहिजे आणि आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. सामाजिक जीवन चांगले चालण्यासाठी जाे अभिनय अनिवार्य असताे, त्यावर नैतिक उपदेश देऊ नका.
रागाने तक्रारही करू नका. तुमचे लक्ष जीवनाच्या पटलावर पूर्ण दक्ष राहून, आपली भूमिका करण्याचे आहे. लाेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, वर्चस्व स्थापित करून तुमचे रूपांतर सहानुभूतीशील हिराे किंवा हिराेइनमध्ये व्हावे.भावना वाचायला शिका इतरांचा स्वभाव वाचायला शिका, असे सांगताना ग्रीन यांनी सांगितले की, तुम्ही जीवनात बालिश हाेऊ नका.लाेकांच्या वर वरच्या वागण्याला खरे किंवा वास्तविक समजू नका. त्यांच्या अभिनय काैशल्याला आपण सत्य समजू नये.तुमच्या निरीक्षण काैशल्यांना धारदार करा. दैनंदिन जीवनात त्यांचा अधिकाधिक सराव करा आणि स्वतःला त्यांच्या खऱ्या भावनांचे तज्ज्ञ वाचक बनवा.