हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्लेषण व सुधारण्याचा काळ राहील. तुम्ही तुमचे काम अधिक व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न कराल. काही जुनी अर्धवट कामे पूर्ण झाल्यामुळे मन संतुष्ट राहील. तशी छाेट्या छाेट्या गाेष्टींची चिंता तुम्हाला सतावू शकते. पण धैर्य व सकारात्मक विचाराने तुम्ही सावरू शकाल.
नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुमच्या कामाची व शिस्तबद्धतेची विशेष प्रशंसा हाेईल. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.जर तुम्ही नाेकरी बदलण्याचा विचार करीत असाल तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे. बिझनेसमध्ये हळू हळू लाभ वाढेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे तुमच्या कुटुंबीयांसाेबतचे संबंध मधुर राहतील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य लाभेल. तुमच्या प्रेमसंबंधात समजुतदारपणा व विश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. या आठवड्यात तुम्ही पिकनिकचा प्लॅन करू शकता.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण पचनासंबंधित समस्या त्रास देण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर ताबा ठेवायला हवा. जर तुम्ही मधुमेह वा उच्च रक्तदाबाचे पेशंट असाल तर विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. जागरण टाळावे.
शुभदिनांक : 16, 20, 21
शुभरंग : पांढरा, हिरवा, निळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवारर
दक्षता : घाईत निणर्य घेऊ नये. आर्थिक देवघेवीत सावध राहावे.
उपाय : राेज दुर्गामातेची पूजा करा व गरिबांना जेवण द्या.