काेल्हापूरच्या पाेलीस दलात सीसीटीव्ही व्हॅन दाखल

    16-Feb-2026
Total Views |
 

van 
 
दंगल नियंत्रणासाठी आणि गर्दीवर नजर ठेवण्यासाठी गृह विभागाकडून जिल्हा पाेलीस दलास सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळाली. गृह विभागातील दळणवळण विभागाचे अपर पाेलीस महासंचालक दीपक पांड्ये आणि विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते पाेलीस अधीक्षक कार्यालयात व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत हाेईल, असा विश्वास पांड्ये यांनी व्य्नत केला. पाेलीस दलाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.त्यात राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना 360 सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दिल्या जात आहेत.यातील एक व्हॅन काेल्हापूर जिल्हा पाेलीस दलास मिळाली. अपर पाेलीस महासंचालक पांड्ये आणि विशेष पाेलीस महानिरीक्षक फुलारी यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
 
या व्हॅनमध्ये चार बाजूला चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात 48 तासांचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे. याचे थेट प्रक्षेपण पाेलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पाेलीस अधीक्षकांच्या माेबाइलवर पाहता येते. चित्रीकरणासह दंगल काबू करणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयाेग हाेणार आहे. राज्यासाठी आणखी 470 सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळणार आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक पाेलीस ठाण्यासाठी एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचे पांड्ये यांनी सांगितले. 21 लाख 50 हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या या विशेष व्हॅनमध्ये 10 ते 12 पाेलीस बसू शकतात. व्हॅनच्या छतावरही पाेलिसांना बसण्याची व्यवस्था केली आहे. आपत्कालीन स्थितीत लागणाऱ्या वैद्यकीय सुविधाही व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत.