वृषभ

    16-Feb-2026
Total Views |

Horoscope 
या आठवड्यात तुमच्यासाठी संतुलन व स्थैर्य घेऊन येईल. तुमच्या जीवनात हळू हळू सकारात्मक बदल पाहायला मिळतील. काही जुने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. कधी कधी गोंधळाची स्थितीराहील पण धैर्य व विवेकाने घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला पुढे नेईल.
 
■ नोकरी-व्यवसाय : नोकरदार जातकांना हा आठवडा प्रगतीचे संकेत देत आहे. कार्यस्थळावर तुमच्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठ अधिकारी प्रसन्न असतील. बढती वा पगारवाढीची चर्चा होऊ शकते. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. नवे सौदे मिळतील. व्यापारवाढीची योजना बनवाल.
 
■ नातीगोती : या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन सुखद राहील. आई- वडिलांकडून आशीर्वाद व मदत लाभेल. जीवनसाथीसोबतचे नाते मजबूत होईल. प्रेमसंबंधात माधुर्य येईल. अविवाहितांना एखादी विशिष्ट व्यक्ती भेटेल ज्याच्याकडून भविष्यासाठी सकारात्मक संकेत मिळतील.
 
■ आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. पण खाण्या- पिण्याबाबतच्या बेपर्वाईमुळे तुम्हाला पोटासंबंधित समस्या राहू शकतात. जास्त तेलकट तळकट व मसालेदार पदार्थ टाळावेत. नियमितपणे व्यायाम करणे व सकाळी फिरायला जाणे फायदेशीर ठरू शकते.
 
■ शुभदिनांक : १६, २०, २१
:
■ शुभरंग पांढरा, हिरवा, निळा
 
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
■ दक्षता घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नये व खर्चावर ताबा ठेवावा.