वृश्चिकया आठवड्यात तुमच्यासाठी उत्साह, आशा व नवी दिशा देणारा असणार आहे.तुम्ही भविष्याबाबत सकारात्मक दृष्टिकाेन बाळगाल आणि नवे काम सुरू करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. काही याेजना अचानक बदलू शकतात पण अखेरीस त्या तुमच्या हिताच्या असतील. धैर्य व संयम राखावा.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत दिसून येत आहेत. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या एखाद्या काेर्सशी संबंधित असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. बिझनेसमध्ये नव्या संधी लाभतील व लाभ वाढेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबससाेबत तुमचे मधुर संबंध राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचे सहकार्य लाभेल. तुमच्या प्रेमसंबंधातविश्वास वाढेल. मित्रांकडून मिळालेल्या मदतीने तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील व तुम्हाला काैटुंबिक समस्या साेडवण्यास मदत मिळेल.
आराेग्य : माेसमी आजारांपासून तुम्ही स्वत:ला जपायला हवे. विशेषत: सर्दीपडशाचा त्रास संभवताे. मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करावे. तुमचे आराेग्य उत्तम राहील पण तुम्ही खाण्यापिण्याबाबत दक्षता घ्यायला हवी. बाहेरचे खाणे तसेच तेलकट तिखट पदार्थ खाणे टाळावे.
शुभदिनांक : 17, 18, 21
शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : आपल्या रागावर ताबा ठेवा व काेणाशीही वाद घालू नका.
उपाय : या आठवड्यात हनुमानाची पूजा करा व मंगळवारी लाल वस्त्र धारण कर