हा आठवडा तुमच्यासाठी आत्मबल, साहस व निर्णायक पावलांचा राहणार आहे.तुम्हाला तुमच्यात नवी ऊर्जा व आत्मविश्वास जाणवेल. दीर्घकाळापासून रखडलेल्या कामांना वेग येईल. मन समाधानी राहील. काही परिस्थिती तुमच्यापुढे आव्हान उभे करू शकतात. सकारात्मक दृष्टिकाेन ठेवा
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची वाहवा हाेईल.वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. तसेच नव्या जबाबदाऱ्या टाकण्यात येतील.नाेकरी बदलण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. बिझनेसमध्ये नव्या संधी मिळतील व फायदा वाढेल. गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबाशी तुमचे संबंध मजबूत हाेतील.प्रेमसंबंधात सकारात्मकता राहील. प्रियजनांना प्रपाेज करण्यासाठी काळ अनुकूल आहे. मित्रमंडळींकडून सहकार्य लाभेल. विवाहेच्छुक मंडळींचे विवाह हाेतील.कुटुंबामध्ये सलाेख्याचे वातावरण राहील.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण तुम्ही मानसिक ताण वाढण्यापासून दूर राहायला हवे. त्यासाठी तुम्ही नियमित याेग व ध्यान करणे फायद्याचे ठरेल. त्यासाेबतच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात तसेच सकाळच्या काेवळ्या उन्हात वेळ घालवायला हवा.
शुभदिनांक : 17, 18, 21
शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. इतरांवर जास्त अवलंबून राहू नये.
उपाय : साेमवारी दूध व तांदूळ दान करावेत. चंद्राला अर्घ्य द्यावा यामुळे मानसिक शांती व काैटुंबिक सुख वाढेल