मनुष्य जीवनात शिकण्याचा प्रवास कधी संपत नाही.जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सातत्याने अनुभवांतून जात असताे आणि ज्ञान मिळवत असताे. पण जसजसे अनुभव आणि ज्ञान यांच्यात वाढ हाेते, आपल्यात ही भावना सुद्धा निर्माण हाेऊ लागते की, आता आपल्याला सर्वकाही माहिती आहे. हीच भावना हळूहळू अहंकारात बदलली जाते; आणि तिथूनच आपली प्रगती थांबते. याच समस्येवर उपाय आहे, जपानी झेन दर्शनचा एक अनमाेल सिद्धांत, शाेशिन.मनात असावे कुतूहल आणि खुलेपणा शाेशिन शब्दाचा अर्थ आहे, नवीन शिकणाऱ्याचे मन.हा सिद्धांत शिकविताे की, आपण काेणत्याही क्षेत्रात कितीही तज्ज्ञ असलाे, तरी आपण प्रत्येक अनुभव, प्रत्येक स्थितीला एका नवीन शिकणाऱ्या प्रमाणे खुल्या आणि कुतूहल असलेल्या मनाने पाहायला पाहिजे. जेव्हा आपण सुरुवातीचा दृष्टीकाेन स्वीकारताे, तेव्हा आपले मन नवीन श्नयतांसाठी खुले राहते. तसे पाहता, जेव्हा काेणी व्य्नती काेणताही विषय प्रथमच शिकत असेल, तेव्हा त्याच्या मनात उत्सुकता, विनम्रता आणि प्रयाेगाची भावना असते.
ताे काेणत्याही पूर्वग्रहाशिवाय सर्व माहिती आत्मसात करण्यासाठी तयार असताे. पण वेळेनुसार ताे जेव्हा त्या विषयात पारंगत हाेताे, तेव्हा आपल्या अनुभवांच्या आधारावर निश्चित चाैकटीत विचार करू लागताे. हीच ‘विशेषज्ञ मानसिकता’ माणसाला लवचिक आणि रचनात्मक हाेण्यापासून अडविते. शाेशिन याच प्रवृत्तीला ताेडताे आणि म्हणताे की, तज्ज्ञ असलाे तरी नेहमी नवीन शिकण्याची इच्छा असायला हवी.नवीन जमान्यात जास्त आहे वेळेला धरून या सिद्धांताचे साैंदर्य यात आहे की, ताे केवळ ज्ञान मिळविण्या पुरताच मर्यादित नाही, तर जीवनाच्या प्रत्येक पैलूला लागू हाेताे. उदाहरणासाठी, एका संगीतकाराला घ्या. अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर ताे स्वत:ला तज्ज्ञ मानू शकताे आणि असा विचार करू शकताे की, त्याला आता काेणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही.अशावेळी त्याची रचनात्मकता हळूहळू कमी हाेऊ शकते.पण जर त्याच संगीतकाराने शाेशिनचा स्वीकार केला, तर ताे प्रत्येक नवीन गीत, प्रत्येक नवी वाद्य त्याच उत्साहाने आणि जिज्ञासेने शिकेल, जसे ताे सुरुवातीला शिकत हाेता. हाच दृष्टिकाेन त्याच्या कलेला सतत सुधारत राहील, विकसित करत राहील आणि वेळेला धरून किंवा प्रासंगिक असेल.