नाते जपताना परस्परांवर प्रेम, विश्वास, संवाद हवा

    16-Feb-2026
Total Views |
 


love
 
 
प्रेम हा नात्यातील सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. ते कमी झाल्यास भावनिक नाते कमी हाेते. नातेसंबंध ही एक प्राेसेस आहे, एक फिनिश्ड प्राेडक्ट नाही. नात्यामध्ये राेज थाेडे-थाेडे प्रेम, स्नेह व्यक्त हाेणे गरजेचे असते. नात्याची काळजी केली तर ते फुलतात.परस्परांबद्दल हवा आदर नात्यांमध्ये एकमेकांविषयीचा आदर नातेसंबंधांना अधिक चांगले बनविताे. आदर करणे हा प्रेम दाखवण्याचा एक प्रकार आहे. आदर मनाला स्थिर ठेवताे. तू जसा-जशी आहे, तसा मला पसंत आहे, ही भावना आदरातून निर्माण हाेते. त्यामुळे नाते अधिक घनिष्ठ हाेते. आदर कमी झाल्यास मतभेद निर्माण हाेतात. कालांतराने नात्यावर नकारात्मक परिणाम हाेतात.एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसमाेर किंवा पार्टनरच्या पाठीमागे निंदा करू नये. तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नये.
 
परस्परांबद्दल हवा विश्वास विश्वास हा संबंधांमधील सर्वांत माेठा पाया आहे. त्यामुळे काही कारणांनी विश्वास तुटला तर, फक्त एकदाच माफी मागून पुन्हा लगेच संपादित हाेईल असे नाही. विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी व्यक्तीच्या भावनांना झालेल्या वेदना समजून घेण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला दुःख झाले, त्यानेही प्रयत्नांची कदर केली पाहिजे. काळाबराेबर सगळंच ठीक हाेऊ शकते. भांडणांचे कारण लक्षात घ्या नात्यांमध्ये भांडणे हाेणे ही बाब फारच स्वाभाविक आहे.पण, त्या भांडणांमध्ये एक-दुसऱ्यांवर हल्ला करण्याऐवजी किंवा जुन्या गाेष्टी किंवा चुका ऐकवण्यापेक्षा, ज्या कारणांमुळे मतभेद झाले आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
 
संवाद सुरू ठेवा सध्या कुटुंबातील बहुतांश सदस्य जबाबदाऱ्यांमुळे घराबाहेर जास्त वेळ राहू लागले आहेत. पण, त्यामुळे परस्परांमधील संवाद कमी झाला आहे, असे दिसते. त्यामुळे भावना मनात दबून राहतात आणि गैरसमज वाढतात. कुटुंबात काही कारणाने वादविवाद, भांडणे झाली तर, शांत चित्ताने एकमेकांशी बाेलणी करायचा प्रयत्न करावा. असहमतीचा क्षण आल्यावर ब्रेक घेता येईल, परंतु जास्त काळ माैन बाळगणे, संवाद बंद करणे याेग्य नाही. संवादाचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. मानसाेपचार तज्ज्ञ सिद्धी मारू यांनी सांगितले की, नात्यामध्ये खुला आणि स्वच्छ संवाद असावा. काेणतेही पूर्वग्रह न ठेवता,एकमेकांवर चुकीचे काॅमेंट न देता संवाद वाढविला पाहिजे. एकमेकांचे विचार, स्वभाव आणि मर्यादा याचा मान राखला पाहिजे.
 
घरातील कामाची वाटणी व्हावी दरराेजच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यास धावपळीच्या जगण्यात कुटुंबातील प्रत्येकाला थाेडी उसंत मिळू शकेल. आल्हाददायक क्षण एकत्र साजरे केल्याने संबंधांमध्ये प्रेम वाढते. गमावलेला विश्वास पुन्हा मिळवता येताे?प्रेमात स्वातंत्र्यही महत्त्वाचे प्रेमाचा अर्थ स्वतंत्रता आहे, मालकी नाही. पण, काही केसमध्ये प्रेम पझेसिव्हनेसमध्ये रूपांतरित हाेते. तू माझ्या बराेबर आहेस म्हणजे मी जे करेल ते तुला स्वीकारावेच लागेल, असे वागणे कंट्राेल करण्याची भावना जाेपासते. कुटुंबातील व्यक्तीला स्पेस, भावनिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.