तुला

    16-Feb-2026
Total Views |
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठीी संतुलन, साैहार्द व प्रगतीचे संकेत देत आहे. तुम्ही तुमचे काम शांतपणे कराल व याेग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक पातळीवर तुमची सक्रियता वाढेल व मानसन्मानात वाढ हाेईल. काही बाबतीत धैर्याची गरज असेल. पण सकारात्मक विचार तुम्हाला पुढे नेतील.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे चीज हाेईल. सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल तसेच वरिष्ठ अधिकारीही तुमच्यावर प्रसन्न असतील. जर तुम्ही नाेकरी बदलण्याच्या विचारात असाल तर उत्तम संधी मिळतील. बिझनेसमध्ये नवे साैदे फायनल हाेऊन लाभ वाढेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहणार आहे.घरातील सर्व मंडळी तुमच्यासाेबत प्रेमाने व जिव्हाळ्याने बाेलतील व वागतील.जाेडीदाराचे सहकार्य लाभेल. तुमच्या प्रेमसंबंधात माधुर्य येईल. मित्रांसाेबत वेळ घालवल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही सुदृढता अनुभवाल. ज्यांना लिव्हरचा आजार आहे तेही तब्बेत सुधारताना पाहतील. परंतु तुम्ही अ‍ॅसिडिटीचा त्रास हाेऊ नये यासाठी खाण्या-पिण्याबाबत दक्षता बाळगावी. मानसिक शांती मिळवण्यासाठी तुम्ही अध्यात्माचा आधार घेऊ शकता.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : पांढरा, हिरवा, निळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : आपल्या रागावर ताबा ठेवा व काेणाशीही वाद घालू नका.
 
 उपाय : या आठवड्यात हनुमानाची पूजा करा व मंगळवारी लाल वस्त्र धारण करा