हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास, साहस व यशाने भरलेला राहणार आहे. तुम्ही तुमच्यातील नेतृत्वक्षमता अधिक मजबूत कराल. काही असेही प्रसंग येऊ शकतात ज्यात तुम्ही तुमची प्रतिमा व प्रतिष्ठा वाढवाल. पण अहंकार व घाई करणे तुम्ही टाळायला हवे.
नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात तुमचे परिश्रम आणि प्रतिभा वाखाणली जाईल. तुम्हाला बढती व मान-सन्मान मिळेल. जर तुम्ही नव्या नाेकरीच्या शाेधात असाल तर उत्तम संधी मिळू शकते. बिझनेसमध्ये लाभ हाेईल व नवे ग्राहक मिळू शकतात. काेणत्याही करारावर सही करण्यापूर्वी अटी लक्षपूर्वक वाचा.
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सुखद राहील. जीवनसाथीसाेबत असलेले संबंध अधिक मजबूत हाेतील. तुमच्या प्रेमसंबंधात माधुर्य वाढेल. मित्रांसाेबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला प्रसन्नता देईल. तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्याल व तुम्हाला एखादे मानाचे पद मिळेल.
आराेग्य : तुमचे आराेग्य सामान्य राहील पण कामाचा जास्त ताण आणि अचानक केलेला प्रवास तुम्हाल थकवू शकताे. प्रवासामुळे शारीरिक ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटेल. पाेटासंबंधित व्याधी अचानक डाेके वर काढू शकतात.पुरेसा आराम करावा आणि नियमित व्यायाम करावा.
शुभदिनांक : 17, 18, 21
शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : काेणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी व्यवस्थित तपासून पाहावे.
े. उपाय : गुरुवारी पिवळी वस्त्रे धारण करावीत व श्रीविष्णूची पूजा करावी.