हा आठवडा तुमच्यासाठी आत्मिक शांती व सकारात्मक बदल घेऊन येईल. तुम्हाला तुमच्यात नवी ऊर्जा असल्याचे जाणवेल. तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने गांभीर्याने पावले टाकाल. काही मुद्दे सुटू शकतात ज्यामुळे तुमचे मन हलके होईल. धैर्य व विश्वास टिकवून ठेवा.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या परिश्रमाचे चीज होईल. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर त्याबाबत तुम्हाला एखादा शुभसमाचार मिळू शकतो. व्यवसायात लाभाचे योग असून नव्या संधी चालून येतील.
■ नातीगोती कुटुंबासोबत मधुर संबंध राहतील. जोडीदाराकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात भावनिक गहराई येईल. तुमचे वैवाहिक जीवनही सुखद व शांतीपूर्ण राहणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत दूरच्या प्रवासाची योजना बनवू शकता. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभेल. त्यांच्यासोबत तुम्ही उत्तम वेळ घालवाल.
आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. पण तुम्ही निद्रानाशापासून जपायला हवे. त्यामुळे तुम्हाला काहीसा थकवा आणि अपचनासारख्या समस्या होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील.
■ शुभदिनांक : १७, १८, २१
शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
■ शुभवार रविवार, मंगळवार, गुरुवार
■ दक्षता या आठवड्यात अनावश्यक खर्चटाळा,