श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयाेजित हिंद-दी-चादर या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयाेजनात काेणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे. आपण केवळ काम म्हणून नव्हे, तर आत्मसमाधानासाठी भरीव याेगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयु्नत डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी केले.खारघरमधील ओवे मैदानात हाेणाऱ्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा डाॅ. सूर्यवंशी यांनी घेतला. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयु्नत फराेग मुकादम, रवींद्र पवार, पनवेलचे आयु्नत मंगेश चितळे, अतिर्नित आयु्नत गणेश शेट्ये, पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक आदी अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. नागरिकांची गैरसाेय हाेणार नाही, याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियाेजन करावे; तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, असे निर्देशही डाॅ. सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना दिले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत जावळे यांनी सविस्तर माहिती दिली.