मिथुन

    16-Feb-2026
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्ही स्वत:ला सक्रय व उत्साही असल्याचे पाहाल. नव्या लाेकांशी संपर्क हाेईल. जाे भविष्यात लाभदायक ठरणारा असेल. काही बाबतीत मन थाेडे अस्थिर राहू शकते. यासठी स्वत:चे विचार नेटके ठेवा. याेग्य याेजना व वेळव्यवस्थापन केल्यास अनेक कामे यशस्वीपणे पार पाडू शकाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या काैशल्य व हुशारीची प्रशंसा हाेईल. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. नाेकरी बदलण्याच्या विचारात असाल तर हा आठवडा अनुकूल आहे. बिझनेसमध्ये नवे प्राेजे्नट व डील फायनल हाेऊ शकतात व ऑनलाइन कामात विशेष फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुखशांती राहील. जाेडीदारासाेबत उत्तम प्रकारे संवाद साधू शकाल. प्रेमसंबंधात मघुरता येईल. पण काेणत्याही छाेट्याशा गाेष्टीवरून वाद घालणे तुम्ही टाळायला हवे. मित्रांसाेबत वेळ घालवल्यामुळे तुमचा तणाव बराचसा कमी हाेईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्य सामान्य राहील पण मानसिक तणाव असण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करायला हवा आणि पुरेशी झाेप घ्यायला हवी. याेग आणि ध्यान करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तसेच राेजचे जेवण वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : पांढरा, हिरवा, निळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : काेणाशीही अनावश्यक वाद घालू नका.आपल्या भावनांवर ताबा ठेवा..
 
 उपाय : राेज हनुमान चालिसा वाचा व शनिदेवाच्या मंदिरात तेल वाहा.