पशुधन केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणार

    16-Feb-2026
Total Views |
 

eco 
 
आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करत आहाेत. तंत्रज्ञानाच्या जाेडणीतून हे क्षेत्र राज्याला जागतिक स्तरावर दुग्धउत्पादनात अग्रेसर बनवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.येथील ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयाेजित महा पशुधन एक्स्पाेच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बाेलत हाेते. या प्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डाॅ. रामास्वामी एन, आयु्नत डाॅ.प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयु्नत जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेकजाॅन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन पाटील व पशुपालक उपस्थित हाेते.
 
अहिल्यादेवी हाेळकर शेळी-मेंढीपालन याेजनेतील विजेत्यांना आणि गाेपाळ रत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाैरवण्यात आले; तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ‘महा पशुधन वार्ता’ या मासिकाच्या दहाव्या अंकाचे प्रकाशन व विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘उमेद’ अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण करण्यात आले.विदर्भ मराठवाडा दुग्धाेत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळादरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतीकात्मक हस्तांतर यावेळी करण्यात आले.