प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पाेहाेचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रातील महापालिकांनी पाॅड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मेट्राे आणि लाेकल प्रवासाला पूरक अशी पाॅड टॅक्सी सेवा एमएमआरमधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा शिंदे यांनी घेतला. नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.नंदनवन येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन साेना, ठाणे महापालिका आयु्नत साैरभ राव, एमएमआरडीएचे अतिर्नित आयु्नत अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी अधिकारी उपस्थित हाेते.
प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्राे स्थानकापर्यंत आणि तेथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी हाेणारी गर्दी; तसेच रस्त्यांवरील वाहतूक काेंडीवर उपाय म्हणून पाॅड टॅक्सीचे नियाेजन करावे. यामुळे मेट्राेचा वापर वाढण्यास मदत हाेईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी हाेईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएची मदत घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात कनेक्टिव्हिटीला सर्वाेच्च प्राधान्य द्यावे.या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण हाेईल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.