मकर

    16-Feb-2026
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्यासाठी नव्या संधी चालून येत आहेत. तुम्ही तुमच्या लक्ष्यांबाबत गंभीर राहाल व सतत प्रवास कराल. काही बाबतीत संथ प्रगती हाेण्याची श्नयता आहे. पण तुम्हाला अखेरीस यश मिळेल. तुम्ही धैर्य टिकवून ठेवायला हवे आणि विचार सकारात्मक ठेवायला हवेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : नाेकरदार जातकांसाठी हा आठवडा उत्तम आहे.कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीची व समर्पक वृत्तीची प्रशंसा केली जाईल. त्यासाेबतच तुम्हाला बढती वा नवी जबाबदारीही मिळू शकते. व्यापाऱ्यांना लाभाचे संकेत मिळत आहेत पण जाेखमीची गुंतवणूक टाळणे याेग्य ठरेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे कुटुंबीयांशी असलेले संबंध अधिक मजबूत हाेतील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून साह्य लाभेल. तुमच्या प्रेमसंबंधात स्थिरता येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबााेबत तसेच जाेडीदारासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पिकनिकलाही जाऊ शकता.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण तुम्हाला हाडांची वा सांध्यांशी संबंधित समस्या हाेऊ शकते. तसेच पचनासंबंधित किरकाेळ समस्यांकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवे. तुम्हाला अपचन वा डाेकेदुखीसारखा त्रासही हाेण्याची श्नयता आहे.
 
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : पांढरा, हिरवा, निळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : काेणत्याही प्रकारचे दुर्लक्ष तब्बेतीवर परिणाम करू शकते.
 
 उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करा व सरसू तेलाचा दिवा लावा.