बाेर व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वांत लहान असला तरी अलीकडे ताे कात टाकू लागला आहे. त्याचे बफर क्षेत्र वाढले असून, पर्यटकांसाठी आता सेलूशिवाय ढगा व राहाटी ही दाेन प्रवेशद्वारे सुरू करण्यात आली आहेत.आता नागपूरमार्गे येणाऱ्या पर्यटकांना ते अधिकच साेयीचे ठरणार आहे.विमानतळपासून सर्वांत जवळचा ठरणारा हा देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे.आता हा प्रकल्प मित्राकडे म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅर्मे शन या शासनाच्या नियाेजन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थेकडे साेपवण्याचा विचार पुढे आला आहे.जिल्हा वार्षिक आराखड्याची बैठक नुकतीच मुंबईत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत आमदार सुमित वानखेडे उपस्थित हाेते. या बैठकीत पालक मंत्री डाॅ. भाेयर यांनी बाेरचा मुद्दा मांडला.राज्य शासनाची ‘मित्रा’ ही संस्था विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी अभयारण्याचे जाणकार आहेत. त्या माध्यमातून बाेर व्याघ्र प्रकल्पाचा विकास व्हावा, अशी विनंती डाॅ. भाेयर यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.