कुंभ

    16-Feb-2026
Total Views |
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी नव्या विचार व प्रगतीचा संकेत देत आहे. तुम्ही रचनात्मक कामांमध्ये रस घ्याल आणि काही नवे प्रयाेगही करू शकता. सामाजिक परिघ वाढेल आणि प्रभावशाली लाेकांशी गाठीभेटी हाेतील. या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जात राहाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.तुमच्या प्रतिभेची प्रशंसा केली जाईल. व्यावसायिक मंडळींना त्यांच्या व्यवसायात नव्या संधी मिळतील व लाभ वाढेल. टे्ननालाॅजी व ऑनलाइन क्षेत्राशी संबंधित लाेकांना विशेष यश मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहील. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. अविवाहितांना काही नव्या व्यक्ती भेटतील. त्यातून एखाद्या व्यक्तीसाेबत तुमचे उत्तम ट्यूनिंग जमेल. डेटिंगसाठी हा काळ उत्तम आहे.त्याचप्रमाणे तुमच्या जुन्या संबंधांतही सुधारणा हाेईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहणार आहे. परंतु तुम्हाला थकवा राहण्याची श्नयता आहे. तुम्ही पुरेशी विश्रांती घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे अपचनाची समस्या राहिल्यामुळे बद्धकाेष्ठता, पित्त इ. चा त्रास हाेण्याची श्नयता आहे. खाण्या-पिण्याबाबत दक्षता बाळगावी.
 
 शुभदिनांक : 16, 20, 21
 
 शुभरंग : पांढरा, हिरवा, निळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : घाईगडबडीत व भावनेच्या भरात काेणताही माेठा निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : शनिवारी गरिबांना काळे तीळ दान करा.