ग्रामीण भागात उद्याेजक घडण्यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा : पंकजा मुंडे

    15-Feb-2026
Total Views |
 


rural
 
‘पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कृषीच्या दराने कर्जपुरवठ्यासाेबत पशुपालनासाठी 50 ट्नके अनुदान दिले जाणार असल्याने या क्षेत्रात माेठ्या प्रमाणात ग्रामीण उद्याेजक तयार हाेतील. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महा पशुधन एक्सपाेच्या उद्घाटनप्रसंगी केले. ओपळे मैदानात हे प्रदर्शन आयाेजिण्यात आले आहे.यावेळी आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन सचिव डाॅ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन, पशुसंवर्धन आयु्नत प्रवीण देवरे तसेच परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आदी उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांच्य हस्ते गाेपूजन झाले. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या ठिकाणी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतंत्र दालनही उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी केले.