ठाण्यातील अवघ्या 7 वर्षांच्या रियांश सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात 30 कि.मी. एकट्याने पाेहून विश्वविक्रम केला. 15नाेव्हेंबर 2025 राेजी 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदांत हे अंतर पाेहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नाेंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे. स्टारफिश स्पाेटर्स फाऊंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रियांश प्रशिक्षण घेत असून, ठाणे महापालिकेच्या (कै.) माराेतराव शिंदतलावात नियमित सराव करत आहे.रेयांशच्या या यशामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेल्याचे महापाैर शर्मिला पिंपळाेलकर यांनी सांगितले.
गाेव्यात हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे 26 जानेवारीस 10 कि.मी.सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी हिंदळेकर, ध्रिती काेळी, समिप्ता व्हावळ, रेयांश खामकर, ओजस माेरे, गार्गी भरणुके, सिद्ध मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ भिलारे यांचाही महापाैर पिंपळाेलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला; तसेच जलतरणपटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला.
रियांशने मालपे जेट्टी ते वाघाेटन जेट्टी हे 15 कि.मी.चे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासांत पाेहून पार केले. 15 कि.मी.चे अंतरपार करणारा रेयांश हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे.त्याची दखल इंडिया बुक रेकाॅर्डने घेतली आहे. रेयांश हा सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी आहे.गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांत त्याने 13 पदके प्राप्त केली आहेत.