नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण विक्रमी वेळेत करण्यात येणार आहे.विमानतळाची सध्याची प्रतितास 300 प्रवासी हाताळणीची क्षमता एक हजारांवर नेण्यात येणार आहे.कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्यासह सभाेवताली व्यापक कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन झाले. 11 महिन्यांत हे आधुनिक विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज हाेईल. या माध्यमातून विमानतळाचा चेहरामाेहरा बदलणार असल्याकडे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष वेधले. वनवास काळात श्रीरामांचे नाशिकमध्ये वास्तव्य हाेते.
हाच धागा पकडून विमानतळाच्या नवीन इमारतीची रचना श्रीरामांच्या धनुष्याच्या आकाराची असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एचएएलच्या मालकीच्या साडेचार हजार एकर जागेवरील विमानतळावर सध्या सहा हजार 900 चाैरस मीटरची प्रवासी टर्मिनल इमारत आहे. जी दरवर्षी 0.3 दशलक्ष प्रवाशांची हाताळणी करते आणि तिची कमाल क्षमता प्रतितास 150 आगमन व 150 प्रस्थानाची आहे. या विमानतळावर दाेन वर्षांत प्रवासी संख्या तिप्पट झाली असून, सध्याची टर्मिनलची प्रतितास 300 प्रवासी हाताळणीची क्षमता ओलांडली गेली आहे. विस्तारीकरणात सध्याच्या टर्मिनल इमारतीशिवाय अतिर्नित 18000 हजार चाैरस मीटर क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत आणि 1600 चाैरस मीटर क्षमतेची अतिर्नित उपयु्नतता इमारत उभारली जाईल. तिची रचना प्रतितास एक हजारहून अधिक प्रवासी हाताळणीच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
नव्या विमानतळात प्रवेश करण्यासाठी सात नवीन दरवाजे, 24 चेक-इन कक्ष, प्रवासी बॅग हाताळणीसाठी आधुनिक प्रणाली, तपासणीसाठी आठ एक्स-रे युनिट, नऊ एस्केलेटर व 10 उदवाहक (लिफ्ट) असतील. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इमिग्रेशन, कस्टम्स, ड्युटी फ्री, एटीएम, चलन विनिमय सुविधा उपलब्ध केली जाईल. विमानांची हालचाल क्षमता 10 वरून 500 वर जाईल. म्हणजे 250 विमाने उतरू (लँडिंग) आणि 250 विमाने उड्डाण (टेक-ऑफ) करू शकतील. सध्या विमानतळावर सहा विमाने उभी करण्याची (पार्किंग) व्यवस्था आहे. विस्तारीकरणात ही क्षमता 18 विमानांवर जाणार आहे.कुंभमेळ्यात प्रवासी विमानांसाेबत लहान, चार्टर्ड विमानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी विमाने उभी करण्यासाठी अतिर्नित जागा उपलब्ध हाेईल.