भारतीय लष्कराला सशस्त्र सेना म्हणणे आवश्यक : भूषण गाेखले

    15-Feb-2026
Total Views |
 

militry 
 
देहाकडून देवाकडे जाताना देश लागताे.जाे देशासाठी बलिदान देताे, त्याला स्वर्ग मिळताे, असे म्हणतात. त्यामुळे अशा सैनिकांना आम्ही नमन करताे. समाज आणि सैन्यदल हे वेगळे नाही. या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. समाज सर्वांना ऊर्जा देताे, ताे नेहमी सैन्याच्या पाठीमागे उभा असताे. आपण कितीही एकमेकांत भांडलाे तरी देशावर संकट आले की सगळे देशवासी एकत्र येतात. युद्ध आवश्यक नाही; पण युद्धाची तयारी गरजेची आहे. त्यामुळे आपल्याकडे काेणी डाेळे वर करून बघणार नाही. आम्हाला सशस्त्र सेना म्हणा, संरक्षण सेना म्हणू नका, असे मत एअरमार्शल भूषण गाेखले (निवृत्त) यांनी व्य्नत केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने दी महार रेजिमेंट 13 व्या बटालियनच्या हीरक महाेत्सवानिमित्त हुतात्मा सैनिकांच्या वीरनारींचा सन्मान साेहळा स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅलमध्ये आयाेजिण्यात आला हाेता.
 
यावेळी मेजर जनरल बिनाॅय पूनेन (निवृत्त), 13 महार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संजीत फुगत, ज्येष्ठ संपादक अरुण खाेरे, सुभेदार मेजर (ऑर्डिनरी कॅप्टन) बापू पाेळके, लेफ्टनंट कर्नल नरेंद्र पाठक, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.बटालियनमधील हुतात्मा सैनिकांच्या 35 वीरपत्नी आणि वीरमातांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रत्येकी 25 हजार रुपये, साडी चाेळी, सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप हाेते.
 
लष्करात महार रेजिमेंटचे माेठे याेगदान आहे. 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने संरक्षण सल्लागार परिषद स्थापन केली. त्यावेळी डाॅ.
बाबासाहेब आंबेडकर त्याचा भाग हाेते.त्यांनी या विषयात अनेक चांगले निर्णय घेतले, हे आपल्याला आज दी महार रेजिमेंट 13व्या बटालियनच्या हीरक महाेत्सवाच्या वर्षी विसरता येणार नाही. मानवता विकसित झाली, तर युद्धाची गरज पडणार नाही, असे खाेरे यांनी सांगितले. समाजाला हे समजते की लष्कराची काळजी किती घ्यावी. ज्या सैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्या पत्नी आज सन्मानित हाेत आहेत, हे अभिमानास्पद आहे, असे पूनेन यांनी सांगितले. कर्नल फुगत यांनीही मनाेगत व्य्नत केले.