पती-पत्नी साेबत राहून राहून त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची एवढी सवय झालेली असते की, दाेघेही एकमेकांचे वेगळे महत्त्व स्वीकारतात पण जाणवू शकत नाही. ना आपल्या वागण्यातून स्पष्टपणे दाखवू शकतात. अशावेळी गुण सामान्य समजले जातात तर दुर्गुंणांबाबत जास्त सावध हाेऊ लागतात. मनात तक्रारी राखून हेही काय जीवन आहे का? असा विचार करू लागतात. एकमेकांची किंमत व गरज तेव्हा कळते जेव्हा ती डाेळ्यांपासून दूर हाेते. समाेर असल्यास फ्नत् अपेक्षाच डाेके वर काढतात व चुकाच दिसतात व असे वाटते की हा जीवनसाथी कदाचित आपल्या अपेक्षांप्रमाणे आपल्याला याेग्य मिळालाच नाही.नाते काेणतेही असाे, प्रत्येकांची स्वत:ची आवडनावड, रुची, संस्कार, इच्छा, अपेक्षा असतात. जाेपर्यंत त्या जुळतात साथ दिली जाते. पण एकाची पसंती दुसऱ्याची नापसंती हाेऊ लागते तेव्हा एक जबरदस्ती दुसऱ्यावर आपले मत लादू इच्छिते. वा वाटते की ताे आपल्या मनासारखा साथी बनवून घ्यावा. त्यानंतर आपसात तणाव, वाद उपजू लागतात.
जाेपर्यंत पती-पत्नी एकमेकांना समजून घेत असतात, पसंत करतात व एकमेकांची पर्वाही करतात ताेपर्यंत त्यांच्या नात्याची व व्यवहाराची गाडी याेग्यप्रकारे चालत राहते, पण जेव्हा ते एकमेकांवर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न करतात वा स्वत:ला बराेबर व साथीला चूक ठरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गाेष्ट बिघडू लागते व दांपत्यजीवनात तणाव निर्माण हाेऊ लागताे.हे मानूनच चालायला हवे की इतर मानवी भावनांप्रमाणे रागही एक सामान्य भावना आहे. एकमेकांवर प्रेम करणारे व आवडणारेजाेडपे एकमेकांविषयी विपरीत मन:स्थितीत फक्त प्रेमाऐवजी ईर्ष्या, चीड व रागही धरतात. प्रेम नक्कीच स्थायी भावना आहे पण फक्त प्रेमानेच संसाराचे कर्तव्य पूर्ण हाेत नाही. इतर प्रयत्नही हवे असतात. त्यामुळे मनाच्या इतर भावनाही वरचेवर निर्माण हाेऊन नात्यावर परिणाम करीत राहतात. जर पती-पत्नी मनापासून एकमेकांना आवडत असतील तर ते प्रेम व विश्वासही बाळगतात आणि अशावेळी किरकाेळ भावना क्वचित कधी निर्माण झाल्या तर समस्या दूर हाेताच प्रेम दाेघांना पुन्हा एकत्र आणते. हे प्रेम उपजताच इतर भावना दूर हाेात.