दहीभात : एक आयुर्वेदिक औषध

    15-Feb-2026
Total Views |
 

Health 
 
मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !आपण गणपतीच्या हातावर दही भात देताे. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व ताे कसा याेग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वे दात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशाेधनात सिद्ध झाले आहे.मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टाेफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते.पण आश्चर्याची गाेष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार हाेत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गाेष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते.
 
शरीरातील इतर घटकांसाेबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटाेनिन आणि मेलाटाेनिन ही रसायने तयार हाेतात. त्यातील सेरटाेनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला हाेणे, झाेप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे हाेतात. ट्रिप्टाेफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे साेपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टाेफॅनचे कर्बाे दकांबराेबर विघटन व्हावे लागते.कर्बाेदकांच्या मदतीने ट्रिप्टाेफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पाेहाेचते. आता असा प्रश्न पडेल की कर्बाेदक सांगितल्यावर दही भाताबराेबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बाेदकांचे प्रमाण जास्त असते.
 
म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटाेनिन जास्त प्रमाणत तयार हाेते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थाेडातरी दहीभात......दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढताेच शिवाय आनंदी राहण्यासही मदत हाेते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पाेट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते.त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी हाेतं.आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आराेग्यावर हाेताे. पुर्वी दही भात आर्वजून खाला जात असे. जाणून घेऊया दही भातखाण्याचे फायदे.
 
वजन कमी हाेते : दही भात नियमित खाल्याने वजन कमी हाेते. कॅरलीज घटतात.
 
तापावर फायदेशीर : ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा हाेत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.
 
पाेट बिघडल्यावर : पाेट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पाेट शांत हाेते.अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळताे.
 
बद्धकाेष्ठतेवर परिणामकारक : तुम्हाला जर बद्धकाेष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात.त्यामुळे पचन व्यवस्थित हाेते आणि बद्धकाेष्ठतेचा त्रास कमी हाेण्यास मदत हाेते.
 
तणावमुक्ती : दही भात खाल्याने तणाव कमी हाेताे. त्यात असलेल्या प्राेबायाेटिक बॅक्टेरीया, अँटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत हाेते.