महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीत वेगळा ठसा उमटवत आहे.राज्याच्या प्रगतीचा वेग कायम ठेवून विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून राज्याचे वेगाने परिवर्तन हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशनसाेबत करण्यात आलेल्या करारावेळी व्य्नत केला. टाटा ट्रस्ट व नामसाेबत झालेल्या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील विकास संपूर्ण राज्यभर पाेहाेचवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठाेड, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक आराेग्य राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर-साकाेरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव (आराेग्य) डाॅ. निपुण विनायक, सचिव (महिला व बालविकास) अनुप कुमार यादव, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नाेएल टाटा, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा आदी उपस्थित हाेते.राज्य शासन आणि टाटा ट्रस्टने राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून धाेरणात्मक भागीदारी केली आहे, असे टाटा यांनी सांगितले. नाना पाटेकर यांनीही शासनासाेबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्य्नत केले.