द्रुतगती मार्गावर बाेरघाटात मदत केंद्र हाेणार

    14-Feb-2026
Total Views |
 
 

ghat 
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी बाेरघाटात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महामार्ग सुरक्षा पाेलिसांच्या (एचएसपी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारीस प्राॅपलीन हा रासायनिक वायू घेऊन जाणारा टँकर उलटून सुमारे 32 तासांपेक्षा अधिक काळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पाेहाेचण्यास वाहतूक काेंडीमुळे विलंब लागला. प्रशासकीय व्यवस्थापनातील अभाव समाेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययाेजना करण्याच्या सूचना एमएसआरडीसी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.
 
त्यानुसार एमएसआरडीसी आणि महामार्ग सुरक्षा पाेलिसांच्या बैठकीत बाेरघाटात कायमस्वरूपी मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.बाेरघाट परिसर खंडाळा ते खाेपाेली दरम्यान सुमारे 18 ते 20 कि.मी.चा आहे. आपत्कालीन स्थितीत तेथे पाेहाेचण्यास विलंब हाेताे. या मदत केंद्रात अवजड वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन, अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा, रुग्णवाहिका, गस्तीसाठी वाहने, पाण्याचा टँकर, प्रकाश यंत्रणा, गॅस हाताळणी साधने, प्रतिसाद विभाग, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. भाैगाेलिकदृष्ट्या पुणे- मुंबई महामार्गावर मध्यवर्ती ठिकाण म्हणून बाेरघाट परिसराची निवड करण्यात आली आहे.हा भाग संवेदनशील असून, अपघात काळात किंवा संकट समयी परिस्थितीनुसार तातडीने घटनास्थळी पाेहाेचता यावे, जलद वाहतूक सुरळीत सुरू राहावी, दीर्घकाळ अडथळा निर्माण हाेऊ नये म्हणून उपा