भारतात चघळायच्या गाेळ्या खाण्याचा ट्रेंड धाेकादायक

    14-Feb-2026
Total Views |
 
 

gel 
झाेप, चिंता ते जीवनसत्त्वांची कमतरता, या सर्वांसाठी एक लवचिक, चवदार उपाय असल्याचे दिसते. पण, डाॅक्टरांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. आता तुमच्या आराेग्याच्या समस्यांसाठी ‘गमीज’ हा एक लवचिक, चवदार उपाय म्हणून समाेर आला आहे. ती हाडांची मजबुती असाे, झाेपेचे चक्र असाे किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असाे. गेल्या काही वर्षांत, आराेग्यासाठीच्या गमीज एका साेयीस्कर व चवीला चांगल्या ‘हेल्थ शाॅट’मध्ये विकसित झाल्या आहेत, ज्या पाण्याशिवाय घेणे देखील साेपे आहे. प्रिस्क्रिप्शन लिहिताना डाॅक्टर ही पहिली पसंती देत नाहीत, तरीही ग्राहकांमध्ये गमीजचा वापर सातत्याने वाढत आहे. डाॅक्टर जीवनसत्त्वांच्या कमतरतेसाठी गमीज वापरण्याला संमती देत असतानाच, लाेकांच्या दैनंदिन जीवनात अतिसेवन केल्याने, काही घटक एकत्र आल्याने किंवा ओव्हरडाेस, याबद्दल सावध राहण्यास डाॅक्टर सातत्याने सुचवतात.
 
सप्लिमेंट्सची साेय : आराेग्यविषयक गमीज त्यांच्या खाण्याच्या साेयीमुळे, चवीमुळे आणि नैसर्गिक घटकांमुळे लाेकप्रिय झाल्या आहेत,’ असे सीके बिर्ला हाॅस्पिटलच्या डाॅ. मनिषा अराेरा म्हणतात. ‘अनेक लाेक सप्लिमेंट्स म्हणून गमीजला पसंती देतात.कारण त्या खाणे साेपे आहे व त्यासाठी पाण्याची गरज नसते.’ विशेषतः ज्या लाेकांना गाेळ्या गिळणे कठीण वाटते, लहान मुलांसाठी किंवा जेव्हा विशिष्ट पाेषक घटकांची गरज असते तेव्हा डाॅक्टर सहसा गमीजची शिफारस करतात. हे कधीही मुख्य उपचार नसतात व शिफारशी सहसा वैयक्तिक रुग्णांच्या गरजा व वैद्यकीय इतिहासावर आधारित असतात. डाॅ. अराेरा यांच्या मते सप्लिमेंट्स जास्त आनंद देतात. मॅक्स सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल्स, वैशाली येथील डाॅ. अजय कुमार गुप्ता म्हणतात, ‘गमीज औषधापेक्षा मनाेरंजनासाठी खाल्लेल्या गाेळ्यांसारख्या वाटतात. याशिवाय, इन्फ्लुएन्सर सपाेर्ट व आकर्षक पॅकेजिंगमुळे गमीज वैद्यकीय उपचारांपेक्षा जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग वाटू लागले आहेत.’
 
गमीजची आवश्यकता : काेव्हिडच्या साथीनंतर, लाेक त्यांच्या आराेग्याबद्दल अधिक काळजी घेत आहेत आहेत आणि त्यांची राेगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी साेपे मार्ग शाेधत आहेत. या रंगीबेरंगी गाेळ्या उत्तम राेगप्रतिकारशक्ती, चांगली झाेप, चमकदार त्वचा आणि तणावमुक्तीचे आश्वासन देतात.‘बहुतेक डाॅक्टर अजूनही गाेळ्या, कॅप्सूल किंवा सिरपच्या औषधांना प्राधान्य देतात. कारण त्यांचे डाेस, शरीरातले शाेषण आणि स्थिरता यावर अधिक अभ्यास झालेला असताे. तरीही, विशिष्ट परिस्थितीत जसे की साैम्य जीवनसत्त्व कमतरता किंवा गाेळ्या घेण्यास कठीण जाणाऱ्या मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी, डाॅक्टर गमीज सुचवू शकताे,’ असे डाॅ. गुप्ता म्हणतात. ‘गमीज सहसा व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता, कॅल्शियम सप्लिमेंटेशन, सांध्यांचे आराेग्य, राेगप्रतिकारशक्ती, आतड्यांचे आराेग्य, तणाव आणि चिंता व एकूण आराेग्यासाठी वापरल्या जातात,’ असे डाॅ. अराेरा सांगतात.
 
जाेखीम आणि वास्तव : ‘आराेग्यविषयक गमीजचे अनेक फायदे असूनही, त्यात जाेखीम देखील आहे,’ अशी चेतावणी डाॅ. गुप्ता देतात. ‘यात साखर जास्त असते, ज्यामुळे दातांच्या समस्या उद्भवू शकतात, चुकीचे डाेस घेतले जाऊ शकतात. गमीज निराेगी जीवनशैलीला पूरक असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचार किंवा चांगल्या सवयींना पर्याय नाहीत,’ असे ते सांगतात. डाॅ. गुप्ता पुढे म्हणतात की, ‘बहुतेक डाॅक्टरांच्या लक्षात येते की लाेक स्वतः हून गमीज घेण्याचा निर्णय घेतात. कारण कधीकधी मित्र किंवा साेशल मीडियाने त्यांना सुचवलेले असते. त्या घेताना काही प्रमाणात जरी जास्त सेवन झाल्यास विषबाधा हाेऊ शकते, तुमच्या शरीरातील हार्माेन्सचे संतुलन बिघडू शकते किंवा तुमचे अवयव काम करणे थांबवू शकतात.’गमीजची निर्मिती : दरम्यान, मॅनकाइंड फार्माच्या जाॅय चॅटर्जी म्हणतात की, त्यांची कंपनी ‘हेल्थओके ब्रँड’ अंतर्गत अनेक आराेग्य आणि वेलनेस गमीज तयार करते. या गमीजसाठी वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. हेल्थओकेच्या गमीज साेयीस्कर, चवदार आहेत आणि पाेषक घटकांचे नियमित सेवन सुनिश्चित करण्यात मदत करतात.
 
‘शिफारशीनुसार गमीज घेतल्यावर दैनंदिन पाेषक सप्लिमेंटेशन साेपे आणि अधिक सुसंगत बनते,’ असे चॅटर्जी पुढे म्हणतात. मॅक्स सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे डाॅ. गुप्ता यांच्या मते, ‘काेणत्याही डेली सप्लिमेंटची सुरुवात करण्यापूर्वी डाॅक्टरांशी बाेलणे नेहमीच फायदेशीर असते, विशेषतः जर तुम्हाला डायबेटीस, किडनीचे आजार असेल, तुम्ही गराेदर असाल किंवा इतर औषधे घेत असाल.दुर्दैवाने, बरेच लाेक आराेग्य व्यावसायिकांचा सल्ला न घेताच गमीज घेणे सुरू करतात.’ कपिव्हा, या वेलनेस कंपनीच्या डाॅ. कीर्ती साेनी यांच्या मते, ही कंपनी इतर वेलनेस सप्लिमेंट्समध्ये गमीज देखील तयार करते. भारतातील खाद्य आणि आहार सप्लिमेंट्ससाठीचे नियामक वातावरण ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ एफएसएसआयद्वारे प्रशासित केले जाते. डाॅ. साेनी यांच्या मते, ‘न्युट्रास्युटिकल विभागाकडून 2028 पर्यंत भारतीय गमीज मार्केटवर वर्चस्व राखण्याची अपेक्षा आहे.’