श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांचे समाधिस्थळ असलेल्या सज्जनगडावर माघ महिन्यातील गुरू प्रतिपदेपासून सुरू झालेल्या दासनवमी महाेत्सवाचा मुख्य साेहळा हजाराे भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.जय जय रघुवीर समर्थच्या जयघाेषाने दूमदूमून गेला. दासनवमीला पहाटे दाेनला समाधी मंदिरात काकड आरती, त्यानंतर पहाटे चारला श्री समर्थ समाधी महापूजा, सकाळी साडेसहाला सज्जनगड गावातून सांप्रदायिक भिक्षा असे कार्यक्रम पार पडले.विशेष पूजेत समर्थांची समाधी अनेक सुवासिक फुलांनी सुशाेभित करण्यात आली हाेती. समर्थ समाधीवरील श्रीराम मूर्तीलाही फुलांची; तसेच पुष्पहारांची विशेष सजावट करण्यात आली हाेती. सकाळी साडेदहाला आरती, छबीना, मानाच्या 13 प्रदक्षिणा झाल्या. दरम्यान, दासनवमी उत्सवासाठी सातारा आगारातर्फे एसटीच्या विशेष फेऱ्या साेडण्यात आल्या हाेत्या. महाशिवरात्रीपर्यंत परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ दर्शनासाठी माेठ्या संख्येने येत असतात.द्र हाेणार