आता काॅफी हाऊसमध्येही कांदा-पाेह्याचा कार्यक्रम

    14-Feb-2026
Total Views |
 

coffee 
 
या कार्यक्रमापूर्वीच मुलीकडील माणसे काॅफी हाेम वा हाॅटेलात जागा बुक करून ठेवतात. ठरलेल्या वेळी दाेन्ही कुटुंबातील माणसे तिथे येतात. तिथेच मुलाला मुलगी दाखवली जाते. या कार्यक्रमात घरातील सारेजण सामील हाेत असतात. स्वत: मुलगाही आलेला असताे; पण याचा अर्थ लग्न ठरतेच असे नाही. बऱ्याचवेळा मुलगा-मुलगी एकमेकांच्या विचाराने प्रभावीत हाेत नसतात आणि त्यामुळे ती गाेष्ट तिथेच संपते.हाॅटेलात वा काॅफी हाऊसमध्ये हाेणाऱ्या या बाेलाचालीचे काही फायदे दिसून येतात. एकतर यामुळे वेळ वाचताे. तसेच घरात कार्यक्रम ठेवल्यास एक मानसिक तणाव निर्माण हाेत असताे, ताे इथे राहात नाही.
 
जेवणाचेच घ्या. आपल्याला आवडणारे पदार्थ दुसऱ्यांना आवडतीलच असे नसते. घरात असणारी ही भीती हाॅटेलात राहात नाही. दुसरी गाेष्ट म्हणजे हाॅटेलात हाेणाऱ्या या कार्यक्रमात काेणालाच काम करावे लागत नसल्यामुळे सारेजण संभाषणात भाग घेण्यास माेकळे असतात. सर्वात माेठा फायदा म्हणजे या पद्धतीमुळे आपल्या मुलीला पाहायला येणार असल्याची गाेष्ट चाळीत वा शेजारी-पाजारी पसरत नाही.महानगरात ज्या वेगाने विवाह हाेत असतात, त्यापेक्षा जास्त वेगाने लग्न माेडणेही चालू आहे. लग्नापूर्वीच मुलीचे मन आणि मुलाचे मत जाणून घेणे गरजेचे झाले आहे.जर दाेघांची मने आणि मते जुळली तर लग्नात काेणताही अडथळा निर्माण हाेणार नाही.