घुसखाेर बांगलादेशी नागरिकांना राेजगारासाठी आश्रय देणारे बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि उद्याेगपतींवर आता कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात गृह विभागाने परिपत्रक जारी केले असून, सर्व प्रशासकीय विभागांना कठाेर कारवाईचे आदेश दिले आहेत.काही व्यावसायिकांच्या वैय्नितक फायद्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धाेका निर्माण हाेत असल्याचे ध्नकादायक वास्तव पाेलीस विभागाने केलेल्या चाैकशीत समाेर आले आहे. बांधकाम व्यावसायिक, छाेटे-माेठे उद्याेजक आणि व्यापारी वैय्नितक आर्थिक हित जपण्यासाठी बांगलादेशी घुसखाेरांना कामावर ठेवत आहेत. हे नागरिक स्वस्तमजुरीवर उपलब्ध हाेत असल्याने अनेक ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला माेठा धाेका निर्माण हाेत असल्याचे राज्य सरकारने या परिपत्रकात नमूद केले आहे.
घुसखाेर बांगलादेशी नागरिकांना काेणत्याही व्यावसायिक आस्थापनांवर कामगार म्हणून ठेवता येणार नाही.बांधकाम मजूर, मेकॅनिक आणि वेल्डर, वाहनचालक, प्लंबर आणि वेटर आदी क्षेत्रांत बांगलादेशी कामगार आढळल्यास थेट मालकांना जबाबदार धरले जाणार आहे. यासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात आणि नियमावलीत सुधारणा करण्याचे संकेतही परिपत्रकात दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सर्वाेच्च असल्याचे सांगत काेणत्याही परिस्थितीत घुसखाेरांना राेजगार दिला जाऊ नये, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे आता अवैध स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक बसणार असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय याेजनांचा लाभ घेणाऱ्यांनाही आता चाप बसणार आहे.