गाेंधळलेले असणं कधीही चांगलं आहे

    13-Feb-2026
Total Views |
 
 
 
Health
 
आपल्याला एखाद्या गाेष्टीवर ठाम असणारे आणि चटकन निर्णय घेऊन माेकळे हाेणारे लाेक फार कणखर वाटतात. अशा नेत्यांचा तर फारच उदाेउदाे हाेताे. ज्यांना फाइलही वाचता येत नाही (सरकारी अधिकाऱ्यांनी बनवलेली फाइल वाचणं ही एक अत्यावश्यक कला आहे राजकारणातली) आणि अधिकाऱ्यांवर विसंबून कशावरही बिनदिक्कत सही करून कार्यक्षमतेचा ढाेल वाजवणारे नेते तर अतिघातक. शहाणे नेते फाइल बारकाईने वाचतात आणि अधिकाऱ्यांनी घुसवलेली फाेलकटं बाहेर काढतात, जनतेच्या हिताचे बदल करून घेतात. कारण, ते शंका घेतात. काेणीही काहीही सांगितलं की लगेच ते बराेबर मानत नाहीत.खरंतर गाेंधळलेलं असणं, कसलाही ठाम निर्णय एका फटक्यात करू न शकणं हे आपली बाैद्धिक वाढ हाेत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनचविचारवंत सांगतात की ठाम फक्त मूर्ख माणसंच असतात आणि शहाणी माणसं नेहमीच गाेंधळलेली असतात, साशंक असतात.
 
एका वयानंतर काही मित्र दुरावतात, त्याबद्दलही लाेकांना वाईट वाटतं. पण, मग शाळेतल्या मित्रांबराेबरचं 25-30 वर्षांनंतर हाेणारं गेट टुगेदर आठवा. त्यातल्या अनेक मित्रांच्या बाबतीत मनात येतं की यांचे आपण मित्र हाेताे? अरे बापरे! त्यांनाही तसं वाटत असू शकतं. एका वयानंतर त्या त्या टप्प्यातली माणसं दुरावत जाणं, ही पण एक प्रकारची वाढच आहे.विचारवंत सांगतात की ठाम फक्त मूर्ख माणसंच असतात आणि शहाणी माणसं नेहमीच गाेंधळलेली असतात, साशंक असतात.एका वयानंतर काही मित्र दुरावतात, त्याबद्दलही लाेकांना वाईट वाटतं. पण, मग शाळेतल्या मित्रांबराेबरचं 25-30 वर्षांनंतर हाेणारं गेट टुगेदर आठवा. त्यातल्या अनेक मित्रांच्या बाबतीत मनात येतं की यांचे आपण मित्र हाेताे? अरे बापरे! त्यांनाही तसं वाटत असू शकतं. एका वयानंतर त्या त्या टप्प्यातली माणसं दुरावत जाणं, ही पण एक प्रकारची वाढच आहे.