महा पशुधन एक्स्पाेच्या लाेगाेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

    12-Feb-2026
Total Views |
 
 
 
dairy
 
पशुसंवर्धन विभागाने परळी वैजनाथमध्ये 13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील महा पशुधन एक्स्पाेचे आयाेजन केले आहे. या प्रदर्शनाच्या बाेधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डाॅ. रामास्वामी एन. यांच्यासह विविध विभागांचे मंत्री; तसेच सचिव उपस्थित हाेते. परळीतील ओपळे मैदानात हे महा पशुधन एक्स्पाे हाेणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध जातीवंत पशुधन पाहण्यास मिळणार आहेत. त्याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध पशुसंवर्धन विषयक याेजनांचे सादरीकरण, पशुपालनविषयक प्रात्यक्षिके आदींसह विविध विषयांवरील 300 स्टाॅल उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारच्या 45हून अधिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.