माेठ्या आवाजातील म्युझिकमुळे ड्रायव्हरच्या हृदयाचे ठाेके वाढतात

    12-Feb-2026
Total Views |
 

car
 
गाडी चालविताना म्युझिक (संगीत) ऐकणे सामान्य गाेष्ट आहे. 80% पेक्षा जास्त ड्रायव्हर म्युझिक ऐकत वाहन चालवितात.पण, विज्ञान याच्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची प्रतिमा सादर करते.अनेक अभ्यासांमधून समजते की, ड्रायव्हिंगच्या दरम्यान म्युझिक चांगला आणि वाईट असे दाेन्ही परिणाम करते.माेठ्या स्तरावर केलेल्या अनेक वैज्ञानिक विश्लेषणांचा निष्कर्ष असा आहे की, संगीत आपल्या गाडी चालविण्याच्या पद्धतीला अनेक प्रकारे प्रभावित करते.म्युझिक ऐकताना ड्रायव्हरचे गाडीच्या गतीवरील नियंत्रण अपेक्षेपेक्षा कमी हाेते.गाड्यांमधील सुरक्षित अंतरसुद्धा अस्थिर हाेते. त्यामुळेच म्युझिक ऐकत ड्रायव्हिंग करणाऱ्यांमध्ये अपघातांची श्नयता वाढते.गतीवर नियंत्रणसुद्धा शांत वातावरणात गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हरच्या तुलनेत कमी हाेते. आश्चर्यचकित करणारी गाेष्ट ही आहे की, म्युझिकमुळे हार्ट रेटसुद्धा बदलताे. साॅफ्ट आणि स्लाे म्युझिकऐवजी ‘फास्ट’ म्युझिक ऐकल्याने हृदयगती वाढतेम्युझिक प्राेसेस करण्याच्या नादात ‘मेंटल वर्कलाेड’ वाढताे. हेच कारण आहे की, हार्ट रेटमध्ये बदल हाेताे.कमी अनुभव असलेल्या ड्रायव्हरवर हाेताे म्युझिकचा जास्त परिणाम
 
 कमी अनुभव असलेले ड्रायव्हर, म्युझिकमुळे लक्ष विचलित हाेण्याबाबत अधिक संवेदनशील असतात. 20-28 वर्षांच्या नवीन ड्रायव्हरवर केलेल्या अभ्यासात आढळले की, तरुण ड्रायव्हर माेठ्या आवाजातील व आनंदी गाणी ऐकताना नेहमी वेगमर्यादा पार करतात.अनुभवी ड्रायव्हर्सवर असा परिणाम दिसून आला नाही.
 
 जास्त अंतराच्या प्रवासात ड्रायव्हर कंटाळवाणा प्रवास टाळण्यासाठी सातत्याने म्युझिक ऐकतात.म्युझिक थकलेल्या ड्रायव्हर्सना सावधपणा कायम राखण्यासाठी मदत तर करते, पण थकवा घालविण्यासाठी ऐकले गेलेले म्युझिक फ्नत 15 ते 25 मिनिटांपर्यंतचमेंदूला सक्रिय ठेवते. त्यानंतर परिणाम समाप्त हाेताे.संकेतांना ओळखण्यात उशीर नवीन ड्रायव्हर्ससाठी माेठ्या आवाजातील आणि वेगवान लयीतील संगीत त्यांचे ‘मानसिक ओझे’ वाढविते. ज्यामुळे त्यांना रस्त्यावरील धाेके किंवा संकेतांना ओळखणे अवघड जाते.आवडीचे म्युझिक आणि माेठा आवाज परिणाम करतात
 
* ड्रायव्हिंगच्या दरम्यान माेठ्या आवाजात संगीत ऐकल्याने गाडीची गती सामान्यपेक्षा आणखी जास्त वाढते. तेच दुसरीकडे हळू आवाजात म्युझिक वाजल्यास ड्रायव्हिंगची गती सर्वसाधारणपणे कमी हाेते किंवा मग कायम स्थिर राहते.
 
* वैज्ञानिक विश्लेषण हे सुद्धा सांगतात की, तुम्ही जर ड्रायव्हिंग करताना आपल्या पसंतीचे म्युझिक ऐकले तर त्यामुळे लक्ष कमी विचलित हाेते. पण, जर दुसऱ्याच्या आवडीचे म्युझिक लादले, तर ड्रायव्हर्सची कामगिरी खराब हाेते. त्यामुळे चूक हाेण्याची श्नयता वाढते.
 
* ओळखीची गाणी तणाव कमी करण्यास मदत करतात. तसेच मेंदूवर ती तितके ओझे टाकत नाहीत, जितके नवीन किंवा न ऐकलेली गाणी टाकतात.