कंपनीचे नेतृत्व दाेन सीईओंकडे देण्याचा ट्रेंड वाढताेय

    10-Feb-2026
Total Views |
 
 

trend 
 
दाेन व्यक्तींना सीईओ पद स्पाॅटीफाई, काॅमकास्ट आणि ओरेकल सारख्या कंपन्यांनी अलीकडेच वरिष्ठ नेतृत्वात माेठे बदल केले आहेत. या तीनही कंपन्यांनी एका व्यक्तीची नव्हे तर दाेन व्यक्तींची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.स्पाॅटीफायचे संस्थापक डॅनियल एक यांनी जवळजवळ 20 वर्षांनंतर सीईओ पद साेडण्याचा निर्णय जाहीर केला.आणि जानेवारीपासून अ‍ॅलेक्स नाेस्ट्रामी आणि गुस्ताव साॅडरस्टाेम यांना सह-सीईओ म्हणून नियुक्त केले.काॅमकास्टने ब्रायन राॅबर्ट्ससह माइक कैवानघ यांना ‘सहसीईओ’ म्हणून नियुक्त केले. ओरेकलने क्ले मैगाॅयरक आणि माइक सिसिलिया यांची सफरा कैट्ज यांच्या जागी संयुक्त सीईओ म्हणून नियुक्ती केली.
 
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज कैलगरी विद्यापीठाचे प्राध्यापक अनुप श्रीवास्तव यांनीसांगितले की व्यवसायातील वाढती गुंतागुंत, एआय, भू-राजकारण सारखे मुद्दे आणि पात्र सीईओंचा अभाव ही याची मुख्य कारणे आहेत. श्रीवास्तव यांच्या मते, कंपन्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असते. एक व्यक्ती सर्व काही हाताळू शकत नाही.सह-मुख्य कार्यकारी अधिकारी या माॅडेलमुळे कंपन्या वेगवेगळे काैशल्य असलेल्या दाेन नेत्यांना एकत्र आणते.आणि चांगले निर्णय घेण्यास परवानगी देते. या माॅडेलमुळे कंपनीचा उत्तराधिकार ठरविण्यास मदत हाेते. जसे काॅमकास्ट कंपनीच्या बाबतीत दिसून आले हाेते.
 
नेत्यांची सध्या कमतरता ऑर्गनाइजेशनल कंसल्टिंग फर्म काॅर्न फेरीच्या जेन एडिसन स्टीवेन्सन यांनी सांगितले की,सीईओच्या पदाची जबाबदारी लगेच स्वीकारू शकतील, अशा नेत्यांची सध्या कमतरता आहे. म्हणून, कंपन्या दाेन लाेकांमध्ये जबाबदारी विभागत आहेत. ज्यांचे काैशल्य एकमेकांना पूरक आहे.अधिक कंपन्या स्वीकारतील हे माॅडेल अमेरिकेतील सुमारे 3 हजार माेठ्या कंपन्यांतील फक्त 1% कंपन्यांमध्ये सह-मुख्य कार्यकारी अधिकारी निवडण्याची पद्धत स्वीकारली आहे. पण, आगामी काळात दाेन प्रमुख निवडण्याची पद्धत वाढेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.जुने नेत्यांचे मार्गदर्शन मिळते व नवीन नेतृत्व तयार हाेते दाेन नेत्यांमुळे स्थिर नेतृत्व निर्माण हाेते. कंपनीच्या भविष्यासाठी हे चांगले ठरते. या माॅडेलमुळे जुन्या अधिकाऱ्यांचा, नेत्यांचाही निर्णय प्रक्रियेत सहभाग राहताे.आणि नवीन सीईओही निर्णय घेऊ शकतात. जुने नेते मार्गदर्शन देत राहतात. नेतृत्व बदल हाेतानाही स्थिरता राहणे श्नय हाेते.